शाळा बंद आंदोलन
By Admin | Updated: August 17, 2014 00:12 IST2014-08-17T00:12:17+5:302014-08-17T00:12:17+5:30
शाळा बंद आंदोलन

शाळा बंद आंदोलन
पेठ : तालुक्यातील हरणगाव व कोपुर्ली येथील विनाअनुदानित माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संस्थाचालकांच्या मनमानीला कंटाळून थेट शाळा बंद आंदोलन छेडले आहे. यामुळे या शाळेतील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले
आहे़
निर्मिती सामाजिक कार्य व संशोधन केंद्र, सटाणा या संस्थेच्या वतीने हरणगाव व कोपुर्ली येथे गत दहा वर्षांपासून विनाअनुदानित माध्यमिक विद्यालय सुरू आहे़ हरणगाव येथे इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात १४७, तर कोपुर्ली येथे १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थाचालकाने गत अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा अनुशेष पूर्ण न केल्याने दोन वेळा शासनाच्या मूल्यांकनात पात्र होऊनही केवळ संस्थाचालकाच्या आडमुठे धोरणामुळे अनुदान मिळत नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी शाळा बंद केली आहे़
हे कर्मचारी अनेक वर्षांपासून विनावेतन काम करत असताना व शासन अनुदान देण्यास तयार असतानाही संस्थाचालकांनी अनुशेष पूर्ण न केल्याने वेतनापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे़ यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून मुकण्याची भीती व्यक्त केली जात आहे़ (वार्ताहर)