शिष्यवृत्ती आवेदनपत्रांसाठी इंटरनेटवरच मदार

By Admin | Updated: November 5, 2014 23:33 IST2014-11-05T22:18:58+5:302014-11-05T23:33:12+5:30

परीक्षा परिषद : आॅनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरण्यास प्रारंभ

For scholarships applications on the internet, | शिष्यवृत्ती आवेदनपत्रांसाठी इंटरनेटवरच मदार

शिष्यवृत्ती आवेदनपत्रांसाठी इंटरनेटवरच मदार

टेंभ्ये : परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची आॅनलाईन आवेदनपत्र ठरण्यास सुरुवात झाली आहे. परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून आवेदनपत्र भरण्यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार शनिवार, दि. १ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान नियमित शुल्कासह आवेदनपत्र दाखल करता येणार आहेत. आॅनलाईन पद्धतीने आवेदनपत्र दाखल करण्यात येणार असल्याने शाळांना पुन्हा एकदा इंटरनेट उपलब्धतेवर अवलंबून राहावे लागणार आहे.
नियमित शुल्कासह पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची आवेदनपत्र भरण्यासाठी दि. ४ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आॅनलाईन पद्धतीने आवेदनपत्र दाखल करुन चलनाची प्रिंट काढण्यासाठी १ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. चलनाप्रमाणे शुल्क बँकेत जमा करण्यासाठी १ नोव्हेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बँकेमध्ये चलन भरल्यानंतर चलन अपडेट करुन प्रपत्र अ ची प्रिंट काढण्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आवश्यक प्रमाणपत्र व परीक्षा परिषदेची चलनाची कॉपी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे दि. ९ डिसेंबरपर्यंत जमा करावी लागणार आहे. नियमित शुल्कासह आवेदनपत्र दाखल करु न शकणाऱ्या शाळांसाठी विलंब शुल्काने आवेदनपत्र भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. आॅनलाईन आवेदनपत्र भरणे व चलनाची प्रिंट काढण्यासाठी दि. ५ ते १९ डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. चलनाप्रमाणे निर्धारित शुल्क बँकेत जमा करण्यासाठी दि. २० डिसेंबर ही अंतिम दिनांक आहे. चलन अपडेट करुन प्रपत्र अ ची दि. २२ पर्यंत प्रिंट घेता येणार आहे, तर दि. २३ डिसेंबर ही गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे आवश्यक प्रमाणपत्र व चलनाची प्रत जमा करण्याची शेवटची मुदत आहे. तसेच दि. २० डिसेंबरपासून परीक्षा सुरु होण्यापूर्वी १५ दिवसापर्यंत अतिविलंब शुल्काने आवेदनपत्र भरता येणार आहेत. आॅनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी शाळांना एक पासवर्ड देण्यात आला आहे. परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरील होमपेजवर असलेल्या स्कूल इन्फॉर्मेशन गेटवेमधील प्रपत्रात नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर पासवर्ड व लॉगीन आयडी एसएमएस केला जातो. १ नोव्हेंबरअखेर ज्या मुख्याध्यापकांना एसएमएसद्वारे लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त न झाल्यास या पेजवरील विहीत नमुन्यात भरलेला अर्ज स्कॅन करुन या पेजवर दिलेल्या इमेलद्वारे पाठवावा, अशी सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
एकंदरीत आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील शाळांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. दुर्गम भागातील अनेक शाळांना तालुक्याच्या ठिकाणी अथवा मोठ्या शहरात जाऊन सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे पूर्वीची आवेदनपत्र दाखल करण्याची पद्धत उपयुक्त होती, असे मत अनेकजणांनी व्यक्त केले. (वार्ताहर)

नियमित शुल्कासह ४ डिसेंबरपर्यंत मुदत.
आॅनलाईन पद्धतीने भरली जाणार आवेदनपत्र.
आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील शाळांसमोर मोठी समस्या.
दुर्गम भागातील अनेक शाळांना शहरातील सायबर कॅफेचा आधार.

Web Title: For scholarships applications on the internet,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.