शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्जेकोट येथे सापडलेल्या खवले मांजराला सोड़ले नैसर्गिक अधिवासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 17:53 IST

Wildlife Malvan Sindhudurg : सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या घरासमोरील वडाच्या झाडाखाली असलेल्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजरांची वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सुटका करत त्याला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडले.

ठळक मुद्देसर्जेकोट येथे सापडलेल्या खवले मांजराला सोड़ले नैसर्गिक अधिवासातवनविभाग कर्मचाऱ्यांनी केली सुटका

मालवण : सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या घरासमोरील वडाच्या झाडाखाली असलेल्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजरांची वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सुटका करत त्याला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडले.सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या जागेत असलेल्या वडाच्या झाडाखाली नेहमीप्रमाणे हर्ष पराडकर, ओंकार आचरेकर, नील आचरेकर ही लहान मुले खेळत होती. यावेळी त्यांना जाळ्यात काहीतरी अडकल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ प्राणीमित्र राजन आचरेकर यांच्या घरी जात त्यांना याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता खवले मांजर जाळ्यात अडकले असल्याचे दिसून आले.

स्थानिक ग्रामस्थांनी कुडाळ येथील वनविभागाचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना याची माहिती दिली. त्यानुसार येथील परिमंडळाचे वनपाल श्रीकृष्ण परीट, कांदळगाव येथील वनरक्षक सारीक फकीर, वनमजूर अनिल परब यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने जाळ्यात अडकलेल्या त्या खवले मांजराची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दळवी यांनी त्या खवले मांजराची तपासणी केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

यावेळी सरपंच नीलिमा परूळेकर, ग्रामपंचायत सदस्य भारती आडकर, गोरज आचरेकर, राजेश पराडकर, रोहन लाड, सुदेश रेवंडकर, जय लाड, स्नेहल आचरेकर, तन्वी पराडकर, किर्ती आचरेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे म्हणाले, वन्यप्राणी खवले मांजर ही अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून त्यास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 न्वये संरक्षण प्राप्त असून त्यास अनुसूचि 1 मध्ये वर्गीकृत केले आहे. ग्रामस्थांनी वेळीच वनविभागास माहिती दिल्याने वन्यप्राणी खवले मांजराचा जीव वाचला आहे. खर्‍या अर्थाने जागतिक पर्यावरण दिन सार्थकी लावल्याबद्दल ग्रामस्थांचा आभारी आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग