शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली'...संजू परबांच्या वक्तव्यावरुन तेली समाज आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 3:48 PM

सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना 'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली' असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेवरुन आता तेली समाज आक्रमक झाला आहे.

कणकवली : सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकीय वादातून टीका करताना 'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली' असा उल्लेख केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. संजू परब या वक्तव्याचा समस्त तेली समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला. त्यांनी दिलगिरी व्यक्त करून आपले विधान मागे घ्यावे. अन्यथा आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली यांनी समाजाच्यावतीने दिला आहे.सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना 'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली' असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेवरुन आता तेली समाज आक्रमक झाला आहे. कणकवली तेली आळी येथील सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत त्यांनी परब यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.यावेळी बोलताना चंद्रकांत तेली म्हणाले , गंगू तेली ही व्यक्तीरेखा इतिहासातच नव्हती. राजा भोज यांच्या काळात  गांगेय नरेश आणि चालुक्य तैलेय हे दोघे राजा होते. ते दोघे एकत्र येऊन भोज राजाशी लढले. ते गद्दार नव्हते. त्याची तुलना करताना शब्दांचा अपभ्रंश झाला आहे.  त्यामुळे राजकीय वक्तव्य करताना जातीचा उल्लेख करून आमच्या भावना  कोणीही दुखावू नयेत.परशुराम झगडे म्हणाले, या वक्तव्यामुळे  आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.  जिल्हयातील आमच्या समाजबांधवांच्या या विषयावरील भावना तीव्र आहेत. त्यामुळे त्याबाबत संजू परब यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही तर त्याचा फटका निश्चितच निवडणुकीत बसेल. आम्हीही  विविध पक्षांचे काम करतो. मात्र, आपल्या समाज संघटनेचे काम करीत असताना आम्ही राजकीय पादत्राणे बाहेर काढून ठेवतो.या पत्रकार परिषदेस तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हा सचिव चंद्रकांत तेली, खजिनदार परशुराम झगडे, माजी जिल्हाध्यक्ष  आबा तेली, शैलेंद्र डिचोलकर, कणकवली तालुकाध्यक्ष प्रकाश काळसेकर, उपाध्यक्ष विशाल नेरकर, तालुका सचिव दत्ताराम हिंदळेकर, साई आंबेरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग