शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सावंतवाडी पालिकेच्या पर्यटन महोत्सवाचा दुसरा दिवस ठरला यादगार, शास्त्रीय गायनाने सावंतवाडीवासीय मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 16:21 IST

सावंतवाडी येथील पालिकेच्यावतीने आयोजित पर्यटन महोत्सवाचा दुसºया दिवशी शास्त्रीय नाट्यसंगीत गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुरेल व शास्त्रशुध्द गायनाने सावंतवाडीकरांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. एकंदरीत पर्यटन महोत्सवाचा दुसरा दिवस यादगार ठरला.

ठळक मुद्देसावंतवाडी पर्यटन महोत्सव २०१७ ची धूमधाम पंडित जयतीर्थ मेवुंडी यांनी सादर केलेल्या गाण्यांनी उपस्थित मंत्रमुग्ध मालवणी सुरांच्या गजाली कार्यक्रमाने सर्वांना हसविले खळखळून

सावंतवाडी : येथील पालिकेच्यावतीने आयोजित पर्यटन महोत्सवाचा दुसºया दिवशी शास्त्रीय नाट्यसंगीत गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुरेल व शास्त्रशुध्द गायनाने सावंतवाडीकरांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. एकंदरीत पर्यटन महोत्सवाचा दुसरा दिवस यादगार ठरला.

सावंतवाडी पालिकेने सलग अकराव्या वर्षी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने सावंतवाडी पर्यटन महोत्सव २०१७ ची धूमधाम सध्या शहरात जोरात सुरू आहे. पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय दर्जाची नृत्यांगना स्मृतिरेखा दास यांचा ओडिसी नृत्याचा कार्यक्रम पार झाला.यावेळी अनेक कलाकारांनी ओडिसा येथील संस्कृती व कला याठिकाणी सादर केली. दरम्यान, पर्यटन महोत्सवाचा दुसरा दिवस सावंतवाडीकरांना मनोरंजनाचा ठरला. पंडित जयतीर्थ मेवुंडी यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एका गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तत्पूर्वी साक्षाकार प्रॉडक्शन प्रस्तुत गाण्याने, मालवणी सुरांच्या गजाली या मालवणी कार्यक्रमाने सर्वांना खळखळून हसविले.या कार्यक्रमातील कलाकारांनी मालवणी संस्कृतीला आधारीत गाण्याच्या चालीवर कार्यक्रम सादर केले. यामध्ये दशावतार व लग्न आदी प्रकार सादर केले. पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाने संगीत क्षेत्रातील श्रोत्यांना जागेवर खिळवून ठेवले.मेवुंडी यांच्या गायनातील आलाप व ताना तसेच त्यांना संगीत साथ देणाºया सर्वांनीच आपली छाप पाडली.कार्यक्रमाच्या सरूवातीला सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी सर्व कलाकारांचे स्वागत केले. त्यानंतर जोग रागातील साजन मोेरे घर आयो या बंदिशीने पंडित मेवुंडी यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरूवात केली.भैरवीने कार्यक्रमाची झाली सांगतापंडित मेवुंडी यांना तबला-निखिला चिंचुरकर, आॅर्गन-अमित पाध्ये, बासुरी-देवप्रिया चटर्जी, हार्मोनियम-अदिती गराटे, पखवाज-प्रथमेश तळवलकर यांनी संगीत साथ दिली. बासुरीवादक देवप्रिया चटर्जी यांनी मेवुंडी यांच्या गाण्याला उत्तम साथ देत सर्वांच्या मनात जागा मिळविली. जयतीर्थ यांनी तराना, तडफे जैसे जलबिन मच्छलिया हे गाणे सादर करतानाच भवानी दयानी या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmusicसंगीत