शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम-सावंत यांची राजकारणात एन्ट्री, भाजपात केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 17:55 IST

सावंतवाडी : येथील संस्थानचे युवराज लखम सावंत-भोसले यांनी राजकारणात एन्ट्री केली. आज, सोमवारी भाजपात प्रवेश करत त्यांनी सर्वानाच धक्का ...

सावंतवाडी : येथील संस्थानचे युवराज लखम सावंत-भोसले यांनी राजकारणात एन्ट्री केली. आज, सोमवारी भाजपात प्रवेश करत त्यांनी सर्वानाच धक्का दिला. मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, पत्नी श्रद्धाराणी भोसले, दाजी राऊळ आदी उपस्थित होते.सावंतवाडी राजघराण्यातील एक व्यक्ती भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा दोन दिवसापूर्वीच होती. मात्र या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून आगामी निवडणूकीच्या  पार्श्वभूमीवर लखम यांनी भाजपात प्रवेश केल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आयत्यावेळी विधानसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाल्यास अनेक इच्छुक उमेदवारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.सावंतवाडी मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपला यश मिळणार?लखम हे राजघराण्यातील असून त्याच्या आजोबांनी अनेक वर्षे या भागाचे प्रतिनिधित्व ही केले होते. तसेच त्याचे अनेक चाहते हे या सावंतवाडी, दोडामार्गसह वेंगुर्ला तालुक्यात सुद्धा आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सावंतवाडी मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्नात असलेल्या भाजपला यश मिळण्याची शक्यता आहे.लखम यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली जाणारलखम सोमवारी भाजपात प्रवेश केला असला तरी पक्षाकडून त्याना कोणते पद दिले जाईल हे अद्याप निश्चित झाले नसून पक्षपातळीवर कोणतेही आश्वासन देण्यात आले नसल्याचे समजते. परंतु येणाऱ्या काळात त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविली जाणार आहे. आजच्या प्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच येथील राजघराण्यातील एक युवा चेहरा भाजपला मिळाल्याने त्याचा निश्चितच फायदा भाजपला होईल अशी अपेक्षा ही फडणवीस यांनी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाSawantwadiसावंतवाडीPoliticsराजकारण