शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

हल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडी रस्त्यावर, मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद : सावंतवाडी बंद यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 19:19 IST

सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत सर्व पक्षीयांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापार बंद होता. रिक्षाचालकांनीही चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हा बंद यशस्वी ठरला.

ठळक मुद्देहल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडी रस्त्यावर, मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद : सावंतवाडी बंद यशस्वी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; निषेधाच्या घोषणा

सावंतवाडी : सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत सर्व पक्षीयांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापार बंद होता. रिक्षाचालकांनीही चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हा बंद यशस्वी ठरला.

येथील जनरल जगन्नाथ भोसले उद्यानाकडून निषेध मोर्चाला सुरूवात झाली व त्यानंतर गांधी चौक येथे हा मोर्चा विर्सजित करण्यात आला. शाळा, कॉलेजच्या मुलांसह शहरातील नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यात पाकिस्तान मुदार्बाद, नीम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है या घोषणांचा समावेश होता. उद्यानाकडून सुरू झालेल्या मोर्चात आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी आमदार राजन तेली, सभापती पंकज पेडणेकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब, शिवसेना तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, नकुल पार्सेकर, पंचायत समिती सदस्य मेघ:शाम काजरेकर, शहरप्रमुख शब्बीर मणियार, नगरसेवक आनंद नेवगी, महेंद्र सांगेलकर, सत्यवान बांदेकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, कीर्ती बोंद्रे्र, क्षिप्रा सावंत, साक्षी कुडतरकर, सुरेश भोगटे, नगसेवक सुधीर आडिवरेकर, परिमल नाईक, उदय नाईक, दीपाली भालेकर, राजू बेग, उत्कर्षा सासोलकर, व्यापारी संघटनेचे जगदीश मांजरेकर, रिक्षा संघटनेचे सुधीर पराडकर, नागरिक, शाळा-महाविद्यालयातील शिक्षक वर्ग आदी सहभागी झाले होते.१४ फेब्रुवारी रोजी जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण भारत देश हळहळला होता. ठिकठिकाणी निषेध व्यक्त करताना दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तान विरोधात आवाज उठवला जात होता. सावंतवाडी तालुक्यातही विविध संघटना, सर्व पक्षांकडून या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानचा पुतळा जाळण्यात आला होता.

दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी एकत्र येत ह्यसावंतवाडी बंदह्णची हाक दिली होती. त्यानिमित्त निषेध मोर्चातही मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले होते.या आवाहनाला साथ देताना शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपली दुकाने व्यवसाय बंद ठेवून मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शाळा, महाविद्यालय, कॉलेज विद्यार्थी, विविध संघटना, रिक्षा व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, मुस्लिम बांधव, नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.उत्तर देण्याची हीच योग्य वेळ : नितेश राणेदहशतवाद्यांना आश्रयस्थान देणाऱ्या पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे. हा संदेश केंद्र सरकारला द्यायचा आहे. जवानांवर हल्ले होतात. जवान मारले जातात. त्याला आता जशास तसे उत्तर द्यावे, अशी भावना भारतवासीयांची झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याची दखल घेत देशवासीयांमध्ये विश्वास निर्माण करावा.

या निषेध मोर्चाच्या माध्यमातून सर्वांनी दाखविलेली एकजूट, प्रेम व भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचविल्या जातील आणि पाकिस्तानला योग्य जागा दाखविण्यात येईल, असा आशावाद आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाsindhudurgसिंधुदुर्ग