सावंतवाडी नगरपालिका अव्वल

By Admin | Updated: November 28, 2014 00:07 IST2014-11-27T22:31:05+5:302014-11-28T00:07:38+5:30

विश्वनाथ वेटकोळी : स्वच्छता अभियानांतर्गत अधिकाऱ्यांची पाहणी

Sawantwadi Municipality | सावंतवाडी नगरपालिका अव्वल

सावंतवाडी नगरपालिका अव्वल

सावंतवाडी : कोकण विभागातून सावंतवाडी नगरपरिषद मालमत्तेच्या दृष्टीने व स्वच्छतेच्या दृष्टीने एक नंबर आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने आपल्या मालमत्तेची चांगली जपणूक केली आहे. त्यामुळे कोेकण विभागातून सावंतवाडी परिषदेच्या एक नंबर येवो, अशी इच्छा जिल्हा उपनिवडणूक अधिकारी रायगड अलिबाग तथा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचे अध्यक्ष विश्वनाथ वेटकोळी यांनी व्यक्त केली.
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचे रायगड अलिबाग येथील पथक सावंतवाडी नगरपरिषदेची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान रायगड अलिबाग समितीचे अध्यक्ष विश्वनाथ वेटकोळी, कार्यकारी अभियंता अजय खोब्रागडे, जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी, सहाय्यक संचालक नगररचना जी. शिंदे, उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजनेचे जे. ए. कुलकर्णी, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, नगरसेवक देवेंद्र टेंबकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, क्षिप्रा सावंत, अफरोज राजगुरू, सुभाष पणदूरकर, विलास जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी वेटकोळी म्हणाले, मंगळवारी सावंतवाडी शहरातील जगन्नाथराव भोसले शिवउद्यानाची पाहणी केली असता, उद्यान चांगल्याप्रकारे अद्ययावत ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर अनेक ठिकाणची पाहणी केली असता, सावंतवाडी नगरपरिषदेने शहर स्वच्छ ठेवले असून याचे श्रेय नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना जाते, असे त्यांनी सांगितले. शहरातील सांडपाणी नियोजनाचे व्यवस्थापनाचे नियोजन, हॉस्पिटलमधून अशुद्ध पाण्याचे व्यवस्थापन, कचरा नियोजन आदी गोष्टी पालिकेन योग्य प्रकारे हाताळल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून कोकणातील सावंतवाडी नगरपरिषदेची दखल घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष म्हणाले, सावंतवाडी शहरात पाणी, वीज एवढ्यावरच न थांबता शिक्षण आणि आर्थिक सुबत्ता मिळण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. आर्थिक सुबत्ता मिळाल्यास मुलांना रोजगारही उत्पन्न होईल. या दृष्टीने एमआयडीसीसारखे छोटेमोठे प्रकल्प आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे साळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले. (वार्ताहर)

केसरकरांचे कौतुक
आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे कामकाज योग्य दिशेने सुरू असून शहरासह तालुक्याच्या विकासासाठी सर्व प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Sawantwadi Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.