शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

सावंतवाडी कारागृह अधीक्षक वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 19:38 IST

कारागृहाच्या चार भिंतींच्या आतमध्ये घडणाºया या घटनांमुळे पुन्हा एकदा सावंतवाडीचे कारागृह वादाच्या भोवºयात सापडले असून, याची दखल कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेणे गरजेचे आहे.

गावकर मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम : वरिष्ठ स्तरावरून चौकशीची गरज, सखोल चौकशी झाल्यास अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : गेल्या सहा महिन्यांत सावंतवाडी कारागृहात दोन कैद्यांचे झालेले मृत्यू तसेच कैद्यांची झालेली मारामारी, कैद्यांचे उपोषण आदी प्रकरणामुळे सावंतवाडी कारागृह तसेच कारागृह अधीक्षक वादाच्या भोवºयात सापडले आहेत. या सर्व प्रकरणामागचे गूढ सत्य केव्हा बाहेर येणार याचीच सर्वजण वाट बघत आहेत. एवढ्या मोठ्या घटना होऊनसुद्धा अद्यापही कारागृहाला वरिष्ठांनी भेट न दिल्याने खरेच या प्रकरणाचे गांभीर्य नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. मनसेच्या तक्रारीनंतर सावंतवाडीच्या प्रांताधिकाऱ्यांनी कारागृह महासंचालकांना दिलेल्या पत्रामुळे कारागृहात घडत असलेल्या घटनांचे गांभीर्य अधोरेखित होत आहे.काही वर्षांपूर्वी सावंतवाडी कारागृहातून कु्ख्यात आरोपी ज्ञानेश्वर लोकरे हा पळून गेला होता. लोकरे पळून गेल्यानंतर कारागृह वरिष्ठ अधिकाºयांनी कारागृहाला भेट देऊन लोकरेला पळून जाण्यासाठी कोणी व कशी मदत केली? यात कोण कोण सामील होते याचे सत्य शोधून काढत दोषींवर कडक कारवाई केली होती. त्यामुळे नंतरच्या काही वर्षांत कारागृह प्रशासनाचा स्वच्छ कारभार समोर येऊ लागला होता. तसेच चांगल्या कामांनी ओळखले जात होते. सामाजिक उपक्रम राबविले जात होते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड असो अगर कैद्यांच्या अंगी असलेल्या विविध कला या नेहमी चर्चेत रहात असत. तत्कालीन कारागृह अधीक्षक कैद्यांच्या माध्यमातून चांगले उपक्रम नेहमीच समाजासमोर आणत होते.मात्र, अलीकडे दोन वर्षांत अधिकारी बदलले आणि चांगले उपक्रम मागे पडले. पूर्वीसारखेच कारागृह वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चेत येऊ लागले आहे. सहा महिन्यांपूर्र्वीे कारागृहातील एक कैद्याचा झालेला मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे सांगून पोलिसांनी त्यावर पडदा टाकला. मात्र, १९ नोव्हेंबरच्या जवळपास दोन कैद्यांमध्ये मारामारी झाली आणि त्यांनी देवळातील घंटा एका कैद्याच्या डोक्यावर मारून त्याला जखमी केले होते. हा प्रकार ताजा असतानाच २१ डिसेंबरला देवगड येथील राजेश गावकर यांचा मृत्यू झाला. या मृत्युचे गूढ अद्याप उलगडले नाही.कैद्याचा मृत्यू झाला की त्या कैद्याचे शवविच्छेदन हे कोल्हापूर येथे केले जाते. त्यामुळे सीपीआर येथून कैद्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे तपास पुढे सरकत नसल्याचे उत्तर पोलीस देत आहेत. मात्र, पोलिसांनी जप्त केलेल्या सीसीटिव्हीमध्ये राजेश गावकर हा कारागृहात दाखल झाल्यानंतर तो आजारी असूनही त्याला रुग्णालयात दाखल केले नाही. ज्या दिवशी तो मृत पावला त्याची वेळ नेमकी किती हे कारागृह प्रशासनाकडे उत्तर नाही. मृत पावल्यानंतर बºयाच वेळाने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १७ डिसेंबरला कारागृहात दाखल करत असताना राजेश गावकर यांच्या अंगावर सात जखमा होत्या. याची तपासणीही सावंतवाडी कुटीर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी केली होती. मात्र, मृत्यूनंतर जेव्हा तपासणी झाली त्यात आरोपीच्या अंगावरील जखमा वाढल्या होत्या.त्यामुळे या प्रकरणाची दखल केंद्र सरकारच्या मानव हक्क आयोगाने तसेच कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेणे बंधनकारक होते. पण अद्याप तशी दखलही घेतली नाही. पोलिसांनी गावकर दाखल झाल्यापासून तो मृत होईपर्यंतचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यातही अनेक धक्कादायक प्रकार पुढे येतील, असे सांगण्यात येत आहेत. या सर्व घटनांचा अभ्यास केला तर कारागृहामध्ये पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. कारागृहाच्या चार भिंतींच्या आतमध्ये घडणाºया या घटनांमुळे पुन्हा एकदा सावंतवाडीचे कारागृह वादाच्या भोवºयात सापडले असून, याची दखल कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेणे गरजेचे आहे.सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी मनसेच्या आलेल्या निवदेनाची दखल घेऊन थेट कारागृह महासंचालकांनाच पत्र दिल्याने या प्रकरणामागची गंभीरता लक्षात येत असून, याचा सखोल तपास होणे तेवढेच गरजेचे बनले आहे.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग