शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवातून सावंतवाडीची ओळख

By admin | Updated: December 29, 2014 00:08 IST

खेमसावंत भोसले : सावंतवाडीतील पर्यटन महोत्सव कार्यक्रमांचा शुभारंभ

सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची चाहूल लागताच नवनवीन पर्यटक सावंतवाडीत येत असतात. या पर्यटकांना या महोत्सवाच्या माध्यमातून सावंतवाडीची ओळख होते. यामुळे असे उपक्रम सुरू ठेवावेत, असे प्रतिपादन श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले यांनी केले. यावेळी राजेसाहेब खेमसावंत यांनी महोत्सवाच्या चौथ्या दिवशीचा शुभारंभ करीत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मेलोडिज फॉरेव्हर या आॅर्केस्ट्राचीही मजा रसिकांनी घेतली.यावेळी श्रीमंत शुभदादेवी भोसले, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, पल्लवी केसरकर, विलास जाधव, सुदन्वा आरेकर, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, देवेंद्र टेमकर, शुभांगी सुकी, साक्षी कुडतरकर, अफरोज राजगुरू, संजय पेडणेकर, किर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, वैशाली पटेकर, अनारोजीन लोबो, क्षिप्रा सावंत, अ‍ॅड. सुभाष पणदूरकर आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तरंगत्या शोभायात्रेमध्ये प्रथम क्रमांक महिषासूरमर्दिनी माऊली कलामंच, द्वितीय पारंपरिक होलीचा उत्सव आरवली-वेंगुर्ले यांनी, तर तृतीय क्रमांक खासकीलवाडा संघाच्या ‘राम वनवास दर्शन’ या देखाव्याने मिळविला. या सर्वांना राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच मिनी पर्यटन महोत्सवात विविध स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या बालकलाकारांसह खुल्या गटातील विजेत्यांनाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच यावेळी नगरपालिकेच्या आरोग्य सभापती देवेंद्र टेमकर, पाणीपुरवठा सभापती शर्वरी धारगळकर, महिला बालविकास सभापती वैशाली पटेकर यांची निवड झाल्याबद्दल राजेसाहेब खेमसावंत व श्रीमंत शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यातआला. (वार्ताहर)रसिक मंत्रमुग्धसावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी इंडियन म्युझिक अ‍ॅकेडमी, सांगली प्रस्तुत ‘मेलोडिज फॉर एव्हर’ आॅर्केस्ट्रा सादर करण्यात आला. या बहारदार अशा आॅर्केस्ट्रामध्ये नवनवीन गाण्यांच्या सुरांमध्ये उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पर्यटन महोत्सवातील व्यासपीठ आॅर्केस्ट्रातील ४० तरुण कलाकारांनी फुलून गेले होते. या कलाकारांनी जुन्या नवीन गीतांचा नजराणा सावंतवाडीवासियांना बहाल केला.