शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg News: वंचितची सावंतवाडी, दोडामार्ग कार्यकारिणी बरखास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:34 IST

येत्या पंधरा दिवसांत तालुका कार्यकारिणी, सर्व आघाडी आणि गाव शाखा पुनर्बांधणी

सावंतवाडी : वंचित बहुजन आघाडीच्या दोडामार्ग व सावंतवाडी तालुका कार्यकारिणीबरोबर सर्व आघाड्या आणि गाव शाखा बरखास्त करण्यात आल्या आहेत. दोडामार्ग प्रभारी तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी नवसोा कदम, तर तालुका अध्यक्षपदाची विजय शेर्लेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत तालुका कार्यकारिणी, सर्व आघाडी आणि गाव शाखा पुनर्बांधणी करून जिल्हा कार्यकारिणीकडे पाठविण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी देले.  म्हाळसाबाई भांडारकर हिंद छात्रालाय टेंबवाडी कणकवली येथे नुकतीच सर्व तालुका अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी यांची कृती बैठक जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.यावेळी जिल्हा महासचिव प्रमोद कासले, जिल्हा संघटक श्यामसुंदर वराडकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शंकर जाधव, कार्यालयीन सचिव संदीप जाधव, देवगड तालुकाध्यक्ष प्रभाकर साळसकर, कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय शेर्लेकर, नवसोा कदम, वागदे ग्रामपंचायत सदस्य दीपक कदम आदी उपस्थित होते. यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायती निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील काही पदाधिकारी आणि माजी पदाधिकारी यांनी जिल्हा नेतृत्व विरोधात सभा घेतली. त्यामुळे त्याची दखल घेऊन पक्ष शिस्तभंगाच्या नोटिसा उपस्थित सर्वांना देण्याचे आणि त्यापैकी पदावर काम करत असलेल्या पदाधिकारी यांना पुढील निर्णयापर्यंत पदमुक्त करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

वंचित बहुजन आघाडी पक्षवाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यरत सर्व आजी-माजी पदाधिकारी यांची एकदिवसीय पद आणि त्यांची जबाबदारी, कर्तव्य आणि अधिकार याबाबत कार्यशाळा घेण्याची नितांत गरज असल्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी