शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सावंतवाडीत रंगली मासे पकण्याची स्पर्धा! राज्यासह गोवा,कर्नाटकातील स्पर्धकांचा सहभाग, राजू पनवेलकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 13:54 IST

कोकणात प्रथमच सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने येथील मोती तलावात भरविण्यात आलेल्या मासे पकडण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा येथील ५६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला.

- अनंत जाधवसावंतवाडी - कोकणात प्रथमच सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने येथील मोती तलावात भरविण्यात आलेल्या मासे पकडण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा येथील ५६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. रविवारी सकाळी ८ वाजता स्पर्धेला सुरूवात झाली ती ११ वाजेपर्यंत चालली. स्पर्धा बघण्यासाठी मोती तलावाच्या काठावर मोठी गर्दी झाली होती. या स्पर्धेत सावंतवाडीचे राजू पनवेलकर यांनी एकूण ४१७ सेंटीमीटरचे १४ मासे पकडत प्रथम क्रमांक पटकावला आहे.सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधत पालिकेने मोती तलावाच्या काठावर राज्यस्तरीय मासे पकडण्याची स्पर्धा आयाजित केली होती. प्रथम महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेल्या स्पर्धेत गोवा व कर्नाटक राज्यातील काही स्पर्धक सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजेपर्यंत तब्बल ५६ स्पर्धकांनी आपली नावे नोंदवली. त्यानंतर त्यांना मोती तलावाच्या काठावर प्रत्येक चौकोन आखून देण्यात आला. तेथे त्यांनी मासे पकडावेत अशी अटक घातली. त्यानुसार मासे पकडणे सुरू झाले.प्रत्येक स्पर्धक पकडलेला मासा परीक्षकांना दाखवत असे व जिवंत पुन्हा तलावात सोडत होता. यावर प्रत्येकाचे गुणांकन ठरले होते. ११ वाजता स्पर्धा संपल्यानंतर विजेत्यांची नावे परीक्षकांनी घोषित केली. यात ४१७ सेंटीमीटरचे १४ मासे पकडत सावंतवाडीतील राजू पनवेलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर रामा वडार यांनी ३७५ सेंटीमीटरचे १२ मासे पकडले. त्यांना व्दितीय क्रमांक  देण्यात आला. तृतीय क्रमांक अ‍ॅशर लोबो यांनी पटकावला. त्यांनी ३३५ सेंटीमीटरचे १० मासे पकडले. विजेत्यांना नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, सुधीर आडिवरेकर, अ‍ॅड. परिमल नाईक यांच्यासह ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, दीपाली सावंत, भारती मोरे, शुभांगी सुकी, दीपाली भालेकर, समृध्दी विरनोडकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, शर्वरी धारगळकर, अफरोज राजगुरू, साक्षी कुडतरकर आदि उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaharashtraमहाराष्ट्र