मुलींना वाचवा... मुलींना शिकवा ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2015 00:39 IST2015-07-23T21:57:47+5:302015-07-24T00:39:24+5:30
रोटरी क्लबचा उपक्रम : चिपळूणमध्ये फलकाद्वारे जनजागृती

मुलींना वाचवा... मुलींना शिकवा ...
अडरे : मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, असा जनजागृती फलक चिपळूण शहरातील रोटरी क्लबतर्फे शिवाजी चौक परिसरात लावून जनजागृती करण्यात येत आहे. स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वंशाला मुलगाच पाहिजे, अशी भावना आजही समाजात आहे. मुलांबरोबरच विविध क्षेत्रात मुली आजही अग्रस्थानी आहेत. मुलींची घटती संख्या लक्षात घेऊन मुलांबरोबरच मुलीही समाजाबरोबर आपल्या घराचे नाव उज्वल करु शकतात. त्यामुळे मुलींनाही मुलांप्रमाणेच शिक्षण देणे गरजेचे आहे. शहरातील रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध ठिकाणी जनजागृती फलक लावण्यात आले आहेत.
रोटरी क्लबचे अध्यक्ष वैभव रेडीज, सेक्रेटरी शैलेश सावंत, खजिनदार प्रसाद सागवेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम हाती घेतला असून, मुलींना वाचवा व शिकवा असा संदेश देणारा फलक लावून जनजागृतीवर भर दिला आहे. चिपळूण शहरातील नाक्यानाक्यावर अनेक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. मुलींना वाचवा, मुलींना शिकवा अभियानातून जनजागृती मोहीम रोटरीने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रोटरीने चिपळूण शहरातील शिवाजी चौक परिसरात फलक लावून प्रबोधन केले आहे. रोटरी कल्बच्या माध्यमातून अध्यक्ष वैभव रेडीज, शैलेश सावंत, प्रसाद सागवेकर व सहकाऱ्यांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. (वार्ताहर)