शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Sindhudurg: सावडाव धबधबा पर्यटकांना घालतोय साद, परजिल्ह्यातील पर्यटक जास्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 16:07 IST

आंबोली नतंर वर्षा पर्यटनासाठी चांगला धबधबा

निकेत पावसकरतळेरे : यावर्षी पावसाचे आगमन लांबल्याने अनेक धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले नव्हते. मात्र, जून अखेरीस पावसाने चांगला जोर धरला. मुंबई गोवा महामार्गावर जवळच असलेला सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आणि सुट्टीत पर्यटक या धबधब्याकडे मोठ्या संख्येने येऊ लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे. अल्पावधीत महाराष्ट्रासह परराज्यात प्रसिद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य सावडाव धबधबा प्रवाहित होण्याची वाट पाहत असतात. यावर्षी पुन्हा एकदा वर्षा पर्यटन सुरू झाले असून जिल्ह्यासह राज्य व परराज्यातील पर्यटकांची उच्चांकी गर्दी आता दिसू लागली.कणकवली पासून अवघ्या 16 किमी अंतरावर तर मुंबई गोवा महामार्गावरून 6 किमी अंतरावर असलेल्या सावडाव धबधबा अनेकांना आकर्षित करतो. या धबधब्या जवळ मोकळी प्रशस्त जागा आहे. शिवाय या धबधब्यात आंघोळ करताना धोकादायक काहीही नाहीय. यावर्षी मान्सून उशिया सक्रिय झाला तरी सावडाव धबधबा परिसरात दमदार पडणा-या पाऊसामुळे धबधबा प्रवाहित झाला आहे. वर्षा पर्यटनांसाठी सावडावकडे येत्या शनिवार, रविवार व विकेंडला वर्षा पर्यटकांची पाऊले वळू लागतात. हिरवीगर्द झाडी, हिरव्या गार निसर्गरम्य वातावरणातून खळखळ वाहणारा धबधबा पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळतो.जिल्हातील आंबोली नतंर वर्षा पर्यटनासाठी चांगला धबधबा असल्यामुळे जिल्हयासह राज्यातून व इतर राज्यातील अनेक पर्यटक सावडावला पसंती देतात. त्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.निसर्गरम्य वातावरणडोंगर पठारावरुन पसरट कड्यावरुन खाली कोसळणारा गर्द हिरव्या झाडा झुडपांतला आनंदाचं उधाणच आलेला सावडाव धबधबा कोसळून लागला असल्याने धबधब्याखाली अनेक पर्यटक आंघोळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. यावर्षी जून अखेरपासून ते सप्टेंबर काळात सावडाव धबधब्यावर पर्यटकांची संख्या दररोज वाढणार असून रविवार व सुटटीच्या दिवसांसह अन्य दिवशीही पर्यटक वर्षा पर्यटनासाठी गर्दी दरवर्षी वाढतीच आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटनRainपाऊस