शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अँटीनावाले कासव पोहोचले लक्षद्वीप समुद्रात, दुसऱ्या कासवाचा वेग मंदावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:42 IST

हा प्रकल्प कासवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्‍यासाठी

संदीप बोडवेमालवण: कासव संवर्धन मोहिमेतील दुसऱ्या टप्प्यात सॅटेलाईट टॅगींग केलेल्या दोन कासवांपैकी बागेश्री हे कासव केरळ किनारा ओलांडून अजून पुढे दक्षिणेकडे लक्षद्वीप समुद्राकडे वळले आहे. तर गुहा हे कासव कर्नाटक किनारपट्टी भागात मागील महिनाभरापासून तिथेच रेंगाळले आहे.मॅंग्रोव्ह फाउंडेशन, महाराष्ट्र वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांच्या रत्नागिरी विभागाच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रत्नागिरीतील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर आणखी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रहाद्वारे टॅग करण्यात आले. दोन्ही मादी असलेल्या या कासवांना बागेश्री आणि गुहा अशी नावे देण्यात आली आहेत.हा प्रकल्प कासवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्‍यासाठी आणि घरटे बनवण्‍याच्‍या साइटवर जाण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या प्रवासाचा मागोवा घेण्‍यासाठी मागील वर्षी सुरू केलेल्या संशोधन कार्यक्रमाचा भाग आहे. गेल्या वर्षी पाच मादी कासवांना जोडलेले ट्रान्समीटर गहाळ झाले, यामुळे मॅंग्रोव्ह फाउंडेशन आणि डब्ल्यू आय आय ने यंदा या दोन कासवांना सॅटेलाइट टॅग केले आहे.दुसऱ्या कासवाचा वेग मंदावला

  • सॅटेलाईट टॅगींग केलेल्या दोन कसवांपैकी बागेश्री केरळ किनारा ओलांडून अजून पुढे दक्षिणेकडे वळली आहे. ती तिथल्या महाद्वीपीय शेल्फ पाण्यात गेली आहे. बागेश्री सातत्याने मार्गक्रमण करताना दिसत आहे. लवकरच ती अरबी समुद्र मागे सोडून लक्षद्वीप समुद्रात प्रवेश करेल. 
  • तर दुसरीकडे गुहा त्याच भागात कायम आहे. गुहा कर्नाटक किनारपट्टीच्या खोल पाण्यात शिरली आहेत आणि हळूहळू दक्षिणेकडे जात आहे. मात्र तिचा मार्गक्रमण करण्याचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्या पासून गुहा त्याच भागात रेंगाळत आहे. 
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग