शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
3
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
5
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
6
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
7
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
8
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
9
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
10
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
11
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
12
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
13
वाहन चालकांनो, ‘आरटीओ’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
14
चेहऱ्यावर पदर, हातात गिटार... 'मैंने कभी सोचा ना था' गाण्याने व्हायरल झालेली नववधू आहे कोण?
15
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
16
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
17
‘कायद्यात त्वरित बदल करा’, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या उद्या बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन 
18
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
19
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
20
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg News: घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, सातारच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 17:49 IST

मृत महेशच्या शर्टच्या खिशात सापडली चिठ्ठी

वैभववाडी : व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील सातारच्या एका विद्यार्थ्याने खोलीत लोखंडी हुकाला गळफास घेऊन सोमवार, १३ रोजी आत्महत्या केली. महेश अनिल गाडवे (मूळ रा. फलटण, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.शहरातून जाणाऱ्या नावळे रस्त्यालगतच्या इमारतीत महेश भाड्याने राहत होता. त्याच्या खिशामध्ये पोलिसांना चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत ‘आपण घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करीत नसल्याने हा निर्णय घेत आहे’ असे लिहिलेले आढळले आहे.महेश गाडवे हा एका व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात चौथ्या वर्षात शिकत होता. वैभववाडीत मित्रांसमवेत तो भाड्याने राहत होता. दोन दिवसांपूर्वी त्याचे मित्र आपापल्या गावी गेल्यामुळे तो खोलीत एकटाच होता. त्याच्या खोलीच्या बाजूच्या खोलीत याच महाविद्यालयातील विद्यार्थी राहतात. सोमवारी त्यांना महेशच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला. त्याला हाक मारूनही कोणताच प्रतिसाद मिळाला न मिळाल्याने अखेर धक्का मारून दरवाजा उघडला. त्यावेळी महेश हा मागील खोलीत लोखंडी हुकाला कापडाने गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळला.याबाबत विद्यार्थ्यांनी पोलिसांना माहिती दिली. उपनिरीक्षक प्रवीण देसाई, सूरज पाटील, पोलिस नाईक मारुती साखरे, अभिजित मोरे, सूरज पाटील हे घटनास्थळी पोहोचले. लटकलेल्या स्थितीतील महेशला खाली काढले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.

त्यामुळे स्वखुशीने आत्महत्यापोलिसांनी संपूर्ण खोलीची तपासणी केली. त्यावेळी मृत महेशच्या शर्टच्या खिशात चिठ्ठी सापडली. यामध्ये त्याने मी घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यामुळे स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच तो शिकत असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी मृताच्या नातेवाइकांना माहिती दिली आहे. ते वैभववाडीत येण्यासाठी निघाले होते.शवविच्छेदन कणकवलीत?वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात असलेल्या तिन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सेवा कालावधी संपला आहे. त्यामुळे रुग्णालयात एकही डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन होऊ शकले नव्हते. अखेर शवविच्छेदनासाठी मृतदेह कणकवलीत नेण्याची वेळ पोलिसांवर आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSatara areaसातारा परिसर