सिंधुदुर्गात संततधार; महामार्ग दोन तास ठप्प
By Admin | Updated: July 30, 2014 22:58 IST2014-07-30T22:57:55+5:302014-07-30T22:58:07+5:30
अतिवृष्टीचा इशारा

सिंधुदुर्गात संततधार; महामार्ग दोन तास ठप्प
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, बुधवारी ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरूच होती. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पिठढवळ पुलावर पाणी आल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, दोडामार्ग तालुक्यातील विविध ठिकाणचे कॉजवे पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.
जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून नॉनस्टॉप सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. आज सकाळपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने ठिकठिकाणी पुलांवरून पाणी वाहत होते. जिल्ह्यात पहिल्यांदाच काही प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. पिठढवळ पुलावरून दुपारनंतर पाणी वाहत असल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)