राजापुरात प्रथमच होतेय आरयुपीएल अंडरआर्म क्रिकेट

By Admin | Updated: December 29, 2014 00:01 IST2014-12-28T22:36:43+5:302014-12-29T00:01:23+5:30

जिल्ह्यात उत्सुकता : लिलाव पध्दतीने खेळाडूंची खरेदी करणार

RUPPL Under-Cricket Cricket | राजापुरात प्रथमच होतेय आरयुपीएल अंडरआर्म क्रिकेट

राजापुरात प्रथमच होतेय आरयुपीएल अंडरआर्म क्रिकेट

राजापूर : कसोटी व एकदिवसीय क्रिकेटला तगडे आव्हान देत अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेटला पाठबळ देणाऱ्या आयपीएलच्या धर्तीवर राजापुरात प्रथमच राजापूर अंडरआर्म प्रीमिअर लीगची स्थापना करण्यात आली आहे. २४ ते २६ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यात प्रथमच अशी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ८ संघ खेळविले जाणार असून, आठ मालक असतील. प्रत्येक संघात एकूण १२ खेळाडू असतील. त्यामध्ये तालुक्यातील आठ, तर बाहेरील चार खेळाडू खरेदी केले जाणार आहेत. प्रत्येक संघात एकूण आठ खेळाडू खेळतील. त्यामध्ये पाच तालुक्यातील एक, तर तीन खेळाडू तालुक्याबाहेरील असतील, अशी नियमावली आयोजकांच्यावतीने करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीला खेळाडूंचा लिलाव लावला जाईल. संघाचे मालक चढ्या बोलीवर त्या खेळाडूला खरेदी करतील. यामध्ये प्रत्येक संघाचा मालक खेळाडूच्या खरेदीसाठी २० हजार रुपये खर्च करु शकेल. लवकरच आठ संघ मालकांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी ३० डिसेंबर ही नावनोंदणीची मुदत ठेवण्यात आली आहे. तर ३ जानेवारीपर्यंत खेळाडूंची निवड केली जाणार आहे. रविवार, दि. ११ जानेवारीला सकाळी १० ते १२ या वेळेत राजापूर जवाहर चौकातील नगरपरिषदेच्या पिकअप शेड हॉलमध्ये खेळाडूंचा लिलाव केला जाणार आहे.
स्पर्धा अंडरआर्म असून, सरदेशपांडे सभागृहात आयोजित केली जाणार आहे. २४ला सायंकाळी ६ वाजता उद्घाटन तर, २६ ला रात्री ११ वाजता स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. सहभागी खेळाडूंना मानधन दिले जाणार आहे. आरयुपीएल या नावाने ही स्पर्धा ओळखली जाईल. अंतिम विजेत्या संघाला चषक व २० हजार रुपये, उपविजेत्या संघाला चषक व १५ हजार बक्षीस दिले जाईल. मॅन आॅफ दी सिरीज ठरणाऱ्या खेळाडूला ५ हजार रुपये बक्षीस असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)


राजापुरात क्रिकेट स्पर्धेबद्दल उत्साह.
दि. २४ ते २६ जानेवारीपर्यंत स्पर्धा रंगणार.
अंडरआर्म क्रिकेटमधील जल्लोष अनुभवणार.

Web Title: RUPPL Under-Cricket Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.