आरोंद्यावासीयांचा कडकडीत बंद

By Admin | Updated: January 7, 2015 00:05 IST2015-01-06T23:17:24+5:302015-01-07T00:05:56+5:30

दगडफेक व लाठीहल्ल्याचा निषेध : गाव पोलिसांच्या गराड्यात; २८ जणांना अटक

The rubbish of randyans is closed | आरोंद्यावासीयांचा कडकडीत बंद

आरोंद्यावासीयांचा कडकडीत बंद

सावंतवाडी/आरोंदा : आरोंदा येथे कंपनी समर्थक व ग्रामस्थ यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत ग्रामस्थांना नाहक गोवल्याच्या निषेधार्थ तसेच ग्रामस्थांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आरोंदावासीयांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळला. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत २८ जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व ग्रामस्थ मिळून १८ जण, तर माजी आमदार राजन तेली यांच्यासह कंपनीच्या १० समर्थकांचा समावेश आहे. या सर्वांना मंगळवारी सावंतवाडीतील न्यायालयात हजर करण्यात आले.
दरम्यान, आरोंद्यात घडलेल्या घटनेनंतर मंगळवारी संपूर्ण आरोंदा गावात तणावाचे वातावरण होते. नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कंपनीलाही पोलीस संरक्षण
देण्यात आले होते. दगडफेकीत जखमी झालेल्या सुशांती पेडणेकर, पांडुरंग कोरगावकर, सूरज सारंग, समीर नाईक यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.
उपअधीक्षक विजय खरात यांच्याकडे पोलीस ठाण्याचा ताबा
सावंतवाडी पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलिसांची तुकडी आणि अन्य पोलीस ठाण्याचे कर्मचारी असे मिळून २०० कर्मचारी ठाण मांडून आहेत. सोमवारपासून पोलीस ठाण्याचा कारभार कणकवलीचे पोलीस उपअधीक्षक विजय खरात यांच्याकडे असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
आरोंद्यातील घटनेला पालकमंत्री जबाबदार असून, मी शासनाचा प्रतिनिधी असल्याचे सांगून ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. यापूर्वी बंदर कामाला स्थगिती दिली असती, तर हा प्रकार घडला नसता.
पालकमंत्री जिल्ह्यात असून ग्रामस्थांना भेटण्यासही गेले नाहीत. मनसे आरोंदावासीयांच्या पाठीशी ठाम असून प्रशासनाने कितीही जेटीचे समर्थन केले, तरी त्याला न्यायालयातून उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत धीरज परब, गुरू
गवंडे, प्रशात मोरजकर आदी उपस्थित होते.
मनसे उपअधीक्षक मोर्चा काढणार
आरोंदा येथील प्रकारानंतर ग्रामस्थांना झालेली मारहाण तसेच ग्रामस्थांवरची दगडफेक याबाबत प्रशासनास जाब विचारण्यासाठी मनसेतर्फे १४ किंवा १५ जानेवारीला पोलीस उपअधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यात ग्रामस्थ सहभागी होणार असून बैठक मंगळवारी आरोंदा येथे झाली.
मला मारण्याचा कट : तेली
आरोंद्यात काल घडलेला प्रकार हा पूर्वनियोजितच होता. हा मला मारण्याचा काँग्रेसचा कट होता, असा गंभीर आरोप माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.



दगडफेकीतील संशयित
प्रशांत नाईक अत्यवस्थ
सोमवारी आरोंदा ग्रामस्थांसह अन्य संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोंद्यातील ग्रामस्थ प्रशांत नाईक यांना न्यायालयाच्या आवारातच चक्कर येऊन ते बेशुद्ध झाले. त्यांच्या तोंडातून रक्तस्रावही होत असल्याने त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

एफआयआरमध्ये खाडाखोड
सावंतवाडी पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या एफआयआरमध्ये खाडाखोड आढळल्याने न्यायालयाने याबाबत पोलीस अधिकाऱ्यांकडून लेखी खुलासा घेतला.

नीतेश राणेंकडून पदाधिकाऱ्यांची विचारपूस
सोमवारी मध्यरात्रीपर्यंत आमदार नीतेश राणे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात थांबून पदाधिकाऱ्यांची विचारपूस केली. मंगळवारीही न्यायालय तसेच रुग्णालयात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

Web Title: The rubbish of randyans is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.