शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगा पोहोचविणारे "आरपीडी"

By admin | Updated: April 2, 2017 22:31 IST

अमृत महोत्सवाकडे वाटचाल : स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झालेले हायस्कूल

रूपेश हिराप ल्ल सावंतवाडी ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न अशा सामाजिक व शैक्षणिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहरात प्रामुख्याने ग्रामीण भागातील बहुजनांच्या मुलांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचावी, या एकमेव उद्देशाने स्वातंत्र्योत्तर काळात सुरू करण्यात आलेल्या राणी पार्वतीदेवी हायस्कूलला ७१ वर्षे पूर्ण होऊन अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. शिक्षणातील नवे बदल स्वीकारून त्या बदलांना सामोरे जाणारे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे उच्च माध्यमिक वर्ग चालविणारे असे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी या संस्थेचे आर. पी. डी. हायस्कूल आहे.शैक्षणिक वसा चालविण्यासाठी सरबहाद्दर विष्णू आत्माराम सावंत, सरदार धोंडजी गोविंद सरसुभेदार, सरदार बहादूर तळेकर, अ‍ॅड. अ. ल. पाटणकर, यशवंत बाबली तथा बाबासाहेब शृंगारे, तुकाराम परब यांनी स्वत:ला झोकून दिले. स्वातंत्र्योत्तर काळात प्रामुख्याने ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने १९४६ साली शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यावेळी आताच्या इमारतीत राजघराणे ‘दी युनियन गर्ल स्कूल’ म्हणून मुलींची शाळा चालवायचे. राणी पार्वतीदेवी त्यावेळी घोड्यावर बसून मुलींना शिकविण्यासाठी येत असत. शिक्षणाच्या उद्देशानेच आताची उभी असलेली इमारत बांधण्यात आली होती. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला आणि १८९५ च्या दरम्यान प्लेगच्या साथीत ही शाळा बेळगाव येथे स्थलांतरित झाली, तर आता ज्या ठिकाणी शांतिनिकेतन ही शाळा सुरू आहे, त्या जागेत शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी युनियन इंग्लिश स्कूल चालवायचे. बेळगाव येथे दी युनियन गर्ल स्कूल गेल्यानंतर राणी पार्वतीदेवी हायस्कूल व युनियन गर्ल स्कूलचे विलीनीकरण होऊन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीची १९५४ साली राणी पार्वतीदेवी म्हणून मुले आणि मुलींची एकच शाळा उदयास आली. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीची स्थापना १९४६ मध्ये झाली. शैक्षणिक क्षेत्रात पाया मजबूत करण्यासाठी सुरुवातीला अनेक मंडळी पुढे आली. त्यात बाळासाहेब निंबाळकर, बाप्पा धारणकर, रवळनाथ तोरसकर. डॉ. जी. जी. मोडक, कॅ. व्ही. बी. सावंत (कमविसदार) अशा अनेक व्यक्तींनी सामाजिक बांधीलकीतून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारून फार मोठे योगदान दिले. दरम्यानच्या काळात त्यावेळची दी युनियन गर्ल स्कूल ही मुलींची शाळा बेळगाव याठिकाणी हलविण्यात आल्याने युनियन इंग्लिश स्कूल आणि दी युनियन गर्ल स्कूल यांचे एकत्रिकरण करून शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी या संस्थेचे नव्याने राणी पार्वतीदेवी हायस्कूल हे १९५४ मध्ये खऱ्या अर्थाने उदयास आले. राणी पार्वतीदेवी हायस्कूल हा शैक्षणिक विकासाचा नंदादीप सतत तेवत ठेवताना सुरुवातीला अनेक समस्या, यक्षप्रश्न निर्माण झाले. या समस्यांवर मात करीत असताना अनेक परिवर्तने घडून आली. तरीही ही संस्था बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी झटत राहिली. त्यानंतर संस्थेला लाभलेल्या य. रा. चौकेकर, डॉ. ग. अ. घाटकर, डॉ. के. एफ. खानविलकर, बी. एस. नाईक, पा. य. रेडकर, माजी आमदार प्रतापराव भोसले, माजी मंत्री पी. के. तथा बाळासाहेब सावंत आणि कोकणबरोबर संपूर्ण महाराष्ट्रावर ज्यांनी दोन दशके अधिराज्य गाजविले ते माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांच्यामुळे संस्थेची भरभराट होऊन संस्था जिल्ह्यात खऱ्या अर्थाने नावारूपास आली. त्यानंतर राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारत यशस्वी विद्यार्थी घडू लागले. संस्थेमध्ये चांगले शिक्षक, मुख्याध्यापक आणि सर्व प्रकारचे योगदान देणारे संस्थाचालक लाभल्यामुळे १९७५ साली राणी पार्वतीदेवी हायस्कूल (आर.पी.डी.) या प्रशाळेत भाईसाहेब सावंत संस्थापक असताना त्यांच्या अथक प्रयत्नातून कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम शाखा असलेले ज्युनियर कॉलेज सुरू झाले. प्रशाळेतून मिळालेल्या दर्जेदार शिक्षणातून अनेक विद्यार्थी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला क्रीडा, प्रशासन आणि व्यापार या क्षेत्रात चमकत आहेत. दरवर्षी प्रशाळेचा निकाल हा उत्तरोत्तर वाढत जात आहे. प्रशाळेत आज एकूण ८० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी काम करीत आहेत आणि त्यांच्याच योगदानातून संस्थेच्या विकासाचा आलेख दरवर्षी वाढत आहे. आज संस्था शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, शांत मोती तलावाच्या काठावर दिमाखात उभी आहे. संस्थेची इमारतही सुसज्ज असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी ही संस्था सुरूवातीला आरोंदा हायस्कूल, माजगाव हायस्कूल, चौकुळ हायस्कूल, दोडामार्ग हायस्कूल, कलंबिस्त हायस्कूल, राणी पार्वतीदेवी हायस्कूल अशा शाळा संस्था चालवित होती. आज यातील चौकुळ हायस्कूल, दोडामार्ग हायस्कूल व राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या तीन शाळा संस्था तितक्याच जोमाने व ताकदीने सुरळीत चालवित आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शहर व ग्रामीण भागातील मिळून २५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशाळेत एकूण २२ वर्ग आहेत, तर मुख्य शाळा मिळून एकूण ४० वर्ग आहेत. ५० संगणकांनी सुसज्ज अशा तीन प्रयोगशाळा आणि ग्रंथालय आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभामंडप आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व व बुध्दिमत्ता विकासात शालेय, सहशालेय, शाळाबाह्य उपक्रम, स्पर्धा परीक्षा, मूल्यमापन हे वेगवेगळे उपक्रम प्रशाळेत नियोजनपूर्वक राबविले जातात. यात क्रीडा स्पर्धात प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले व प्रशाळेचे नाव वेळोवेळी उंचावले आहे. कबड्डी, शूटिंगबॉल, व्हॉलिबॉल, ज्यूदो आदी क्रीडा प्रकारात प्रशाळेच्या विद्यार्थिनींनी यश मिळविले आहे. त्यामुळे क्रीडा शिक्षणातही संस्था मागे नाही. आज एकविसाव्या शतकात स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता वाढविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. मुलांना शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांच्या नेमणुका, सुसज्ज संगणक कक्ष, कला-क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान सुसज्ज वर्गरचना आणि अभ्यासक्रमाच्या पायाभूत सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यासाठी संस्था झटत आहे. आज २१ व्या शतकातही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता वाढविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. मुलांची व्यवसाय क्षमता शक्ती वाढली पाहिजे, असा पालकांचाही मानस असतो. त्यादृष्टीने मी व माझे सहकारी प्रामाणिकपणे झटत आहोत. त्यासाठी मुलांना शैक्षणिक पायाभूत सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ कार्यरत आहे. -विकास सावंत, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे कार्यकारी मंडळअध्यक्ष : विकास सावंतसचिव : एस. ए. सावंतखजिनदार : सी. एल. नाईकशाळा समिती अध्यक्ष : दिनेश नागवेकरसदस्य : तुकाराम नाईक, संदीप राणे, चं. मु. सावंत, सुधाकर सुकी, व्ही. बी. नाईक, आर. वाय. पाटील. उच्च पदावर कार्यरत असणारे विद्यार्थीसंजय तारीबागील (डॉक्टर), गिरीश देशपांडे (इंजिनिअर), दयानंद गवस (पोलिस अधिकारी), दत्तात्रय सावंत (लहान मुलांचे डॉक्टर),