शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नेरूरमधील रोंबाट ( मांड) उत्सव अलोट गर्दीत संपन्न , शिमगोत्सवातील अनोखी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 18:52 IST

नेरूर सायचे टेंब येथील मांड उत्सवामध्ये आकर्षक २० ते २५ फुटांची भव्यदिव्य अशी चलचित्रे, देखावे व पारंपरिक रोंबाटांच्या सादरीकरणाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

- रजनीकांत कदमकुडाळ (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील नेरूर सायचे टेंब येथील मांड उत्सवामध्ये आकर्षक २० ते २५ फुटांची भव्यदिव्य अशी चलचित्रे, देखावे व पारंपरिक रोंबाटांच्या सादरीकरणाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा मांड उत्सव  पार पडला. कोकणातील प्रत्येक गावामध्ये होळी, शिमगोत्सव सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असून, कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील शिमगोत्सवालाही आगळीवेगळी परंपरा व वेगळे महत्त्व असून होळीच्या तिसऱ्या दिवशी येथील साईचे टेंब येथे होणारा मांड उत्सव त्यामध्ये सादर होणारे देवदेवता, राक्षस,  प्राणी पक्षी यांचे भव्यदिव्य २० ते २५ फूट उंचीचे चलचित्र असणारे देखावे यांच्या बरोबर पारंपरिक वेशभूषा केलेली सोंग यामध्ये प्रामुख्याने मारुती, राक्षस, भूत, सिंह, मगर तसेच इतर सोंगे तसेच हातात लेझीम घेऊन असणारी लहान मुले असतात.  या सर्वांचे सुश्राव्य संगीत साथीवर होत असणारे नृत्य व सादरीकरण हे या मांड उत्सवाचे खास आकर्षण असून हा मांड उत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर रत्नागिरी तसेच इतर जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांबरोबरच गोवा, कर्नाटक या राज्यातील ही प्रेक्षक दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात.यंदा ही हा मांड उत्सव शनिवार ३ मार्च रोजी रात्री झाला. या मांड उत्सवाची सुरुवात सायं. ४ वाजल्यापासून धार्मिक पारंपरिक कार्यक्रमांनी झाली. त्यानंतर रात्री १० वाजता नेरुर सायचे टेंब येथे या शिमगोत्सवाला सुरुवात झाली. यंदाच्या या शिमगोत्सवामध्ये कै. आना मेस्त्री यांच्या ग्रुपने भव्य दिव्य व आकर्षक असे पक्षी व प्राणी बनविले होते, दिनू मेस्त्री यांच्या ग्रुपने भव्य दिव्य अशी मारुतीची व दोन राक्षसांची प्रतिकृती उभारून रामायणातील एक प्रसंग या देखाव्यातून चित्रित केला होता, बाबा मेस्त्री ग्रुपने अमृतकुंभ अभिलाषा हा राहुकेतूवर आधारित पौराणिक भव्यदिव्य देखावा केला होता, विलास मेस्त्री ग्रुपने देवी कात्यायनी स्वरूप, कालिया मर्दन व कृष्णलीला यावर चार भव्य दिव्य असे २० ते २५ फुटापर्यंतचे पौराणिक देखावे उभारले होते. या देखाव्यां बरोबरच प्रत्येक ग्रुपमध्ये विविध देवदेवता,  प्राणी व इतर पात्रे सहभागी होती.

तुफान गर्दी, उत्स्फूर्त प्रतिसादहा मांड उत्सवाचा थक्क करणारा नेत्रदीपक सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील तसेच गोवा व कर्नाटक राज्यातील हजारो प्रेक्षकांनी तुफान गर्दी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.