शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन प्रकरणात जिल्हा महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 17:40 IST

Kudal Sindhdudurg- सांगिर्डे येथील इमारत क्रमांक ४०५६ भूसंपादन मोबदला परमार प्रकरणात जिल्हा महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी करीत, संगनमताने केलेल्या शासननिधी अपहारप्रकरणी संबंधितांवर कारवाईस एवढा विलंब का होतोय? जिल्ह्याच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी या भ्रष्ट कारभाराची दखल घेणार का? असे सवालही उपस्थित केले आहेत.

ठळक मुद्दे भूसंपादन प्रकरणात जिल्हा महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पदजिल्हाधिकारी या भ्रष्ट कारभाराची दखल घेणार का?

कुडाळ : सांगिर्डे येथील इमारत क्रमांक ४०५६ भूसंपादन मोबदला परमार प्रकरणात जिल्हा महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी करीत, संगनमताने केलेल्या शासननिधी अपहारप्रकरणी संबंधितांवर कारवाईस एवढा विलंब का होतोय? जिल्ह्याच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी या भ्रष्ट कारभाराची दखल घेणार का? असे सवालही उपस्थित केले आहेत.

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ उपक्रमात कुडाळ सांगिर्डे येथील इमारत क्रमांक ४०५६ भूसंपादन मोबदला प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग व मांगीलाल परमार यांनी खोटा व बनावट प्रस्ताव बनवून संघटितपणे भ्रष्टाचार करीत शासनाचे ४७ लाख ११ हजार रुपये मोबदला रक्कम हडपल्याप्रकरणी सक्षम प्राधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी सादर आहेत. मात्र, त्यावर अद्याप फौजदारी प्रकारची कारवाई होत नाही. हे पाहता महसूल प्रशासनच अशा भ्रष्टाचाराला खत-पाणी घालत असून भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे.अन्यथा जनतेत चुकीचा संदेश जाण्याची भीतीया गंभीर प्रकरणात आता जिल्ह्याच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तत्काळ कारवाईचे आदेश निर्गमित करावेत. अन्यथा जिल्हा प्रशासन भ्रष्ट कारभाराबाबत गंभीर नसून व भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा चुकीचा संदेश जनतेमध्ये जाण्याची भीती आहे. यामुळे भविष्यात भ्रष्टाचार वाढीस लागून अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होतील, अशी भीती मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केली आहे.

टॅग्स :kudal police stationकुडाळ पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभागMNSमनसे