शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील रिंगरोड ठरणार पथदर्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 17:44 IST

Pwd Kankavli Sindhudurg- कणकवली शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या रिंगरोडचा आचरा रोड ते गांगोमंदिर हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर गांगोमंदिर ते चौंडेश्‍वरी मंदिर आणि तेथून रवळनाथ मंदिर या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम नगरपंचायतीने सुरू केले आहे. पाच टप्प्यात प्रस्तावित असलेला हा रिंगरोड नियोजनाप्रमाणे लवकर पूर्ण झाल्यास कणकवली शहर विकासाच्या दृष्टीने पथदर्शी ठरणार आहे.

ठळक मुद्देशहर विकासासाठी ठरणार महत्वपूर्ण ग्रामीण भागालाही होणार फायदा

सुधीर राणे

कणकवली : कणकवली शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या रिंगरोडचा आचरा रोड ते गांगोमंदिर हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर गांगोमंदिर ते चौंडेश्‍वरी मंदिर आणि तेथून रवळनाथ मंदिर या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम नगरपंचायतीने सुरू केले आहे. पाच टप्प्यात प्रस्तावित असलेला हा रिंगरोड नियोजनाप्रमाणे लवकर पूर्ण झाल्यास कणकवली शहर विकासाच्या दृष्टीने पथदर्शी ठरणार आहे.कणकवलीतील सर्व वाड्यांना जोडणारा हा रिंगरोड शहर विकास आराखड्यात सन १९९९ मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. मात्र, निधीची कमतरता तसेच भूसंपादन प्रक्रियेतील अडथळे, काही जागा मालकांचा विरोध यामुळे हे काम मार्गी लागले नव्हते. एप्रिल २०१८ मध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली बंडू हर्णे आणि सहकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर या रिंगरोडला प्राधान्य दिले. त्यानुसार रिंगरोडचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

त्याचे लोकार्पण गुरुवारी केले जाणार आहे. तर पुढील वर्षभरात दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण होणार आहे. निधीची उपलब्धता झाली तर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील रिंगरोडचेही काम पुढील दोन वर्षात मार्गी लावण्याचा निर्धार नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केला आहे.दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी सुमारे दोन कोटींचा खर्च येणार आहे. त्यासाठीची तरतूदही नगरपंचायतीने केली आहे. या रिंग रोडचा पहिला टप्पा आचरा रोड ते गांगो मंदिर, दुसरा टप्पा गांगोमंदिर ते चौंडेश्‍वरी मंदिर,तिसरा टप्पा चौडेंश्‍वरी मंदिर ते रवळनाथ मंदिर, चौथा टप्पा रवळनाथ मंदिर ते दत्तमंदिर बांधकरवाडी तिठा व पाचवा टप्पा नरडवे तिठा, बिजलीनगर, नेहरू नगर ते आशिये रोड असा आहे.अविकसित भाग होणार विकसितशहरातील बाजारपेठ आणि रेल्वेस्थानक रोड परिसरातच मोठ्या प्रमाणात निवासी, व्यापारी बांधकामे झाली. मात्र ,शहराचा उत्तर आणि पूर्व दिशेचा ६० टक्‍के भाग अंतर्गत रस्त्यांचे जाळे नसल्याने अविकसित राहिला आहे. हा भाग या रिंग रोडमुळे विकसित होणार आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग