शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर, भातपिकाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:49 IST

Rain, Sindhudurg News, Farmar गेले काही दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसाने खारेपाटण दशक्रोशीत धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे.

ठळक मुद्देपरतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावरभातपिकाचे मोठे नुकसान, शेतकरी चांगलेच अडचणीत

खारेपाटण : गेले काही दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसाने खारेपाटण दशक्रोशीत धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे ऐन कापणीवेळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व भातपीक जमिनीवर पडून पुन्हा त्याला कोंब येत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.परतीचा पाऊस हा दरवर्षीच असा धुमाकूळ घालीत असतो. सध्या परतीच्या पावसाचा हंगाम सुरू आहे. गेल्या आठवड्याभरात हा पाऊस सायंकाळी किंवा दुपारच्या सुमारास येतो. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस जवळपास दोन ते तीन तास सलग पडतो.भात कापणीचा हंगाम सुरू असताना परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतमळ्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. पावसामुळे भातशेती आडवी झाल्याने पावसाच्या पाण्यात भिजत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असल्याने ऐन भातकापणीवेळीच पाऊस पडल्याने पीक वाया जात आहे. परतीचा पाऊस असाच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांच्या संकटात वाढ होणार आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करावा व ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.खारेपाटण येथे परतीच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेले दिसत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग