भूमिपुत्रांना जमिनी परत करा

By Admin | Updated: July 24, 2014 21:43 IST2014-07-24T21:34:30+5:302014-07-24T21:43:18+5:30

शिरोडा-वेळागर : पोलिसांच्या लाठी हल्ल्याचा निषेध दिन

Return land to the land masses | भूमिपुत्रांना जमिनी परत करा

भूमिपुत्रांना जमिनी परत करा

शिरोडा : शिरोडा-वेळागर सर्व्हे नंबर ३९ ची स्थगिती उठविण्यात यावी. या जमिनींवर कोणताही प्रकल्प आणलेला नसल्याने स्थानिकांना या जमिनी परत देण्यात याव्यात, अशी मागणी शिरोडा येथील भूमिपुत्रांनी केली. सुमारे वीस वर्षांपूर्वी शिरोडा वेळागर येथे झालेल्या पोलिसांच्या अमानुष लाठी हल्ल्याचा मंगळवारी निषेधदिन पाळण्यात आला. वेंगुर्ले तालुक्यात मोठ्या प्रकल्पांकरिता शेकडो एकर जमिनी घेण्यात आल्या, परंतु त्यापैकी एकही प्रकल्प सुरु होऊ शकला नाही. वेळागरमधील नियोजित पंचतारांकित हॉटेल प्रकल्प हे याचेच उदाहरण आहे. या भूमिपुत्रांना तत्काळ नोकऱ्या देण्याचे अभिवचन देऊन वीस वर्षे त्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनी ज्यांच्या आहेत त्या स्थानिकांना परत देण्याची मागणी संघर्ष समितीचे सल्लागार जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत करण्यात आली. केंद्राच्या निवास, न्याहारी योजनेप्रमाणे सर्व्हे नंबर ३९ मधील भूमिपुत्रांनी आपापल्या जागेत पर्यटकांची व्यवस्था करुन शासनाला अभिप्रेत असलेला पर्यटन विकास गेल्या पाच वर्षात करुन सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे. सर्व्हे नंबर ३९ सह बिनाविकास घेतलेल्या सर्व जमिनी तत्काळ भूमिपुत्रांना द्याव्यात, अशी मागणी या सभेवेळी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत वेळागर संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ भगत, सचिव आजू अमरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रिती भगत, मिंगेल सोज, समीर भगत, मदन अमरे, अनिल निखार्गे आदींनी विचार मांडले. दरम्यान, वेळागर येथील सर्व्हे नंबर ३९ चा प्रश्न भिजत घोंगड्याप्रमाणे न ठेवता भूमिपुत्रांना जमिनी परत करत त्यांना बंधनमुक्त करावे, अशी मागणी माजी सरपंच राजन गावडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Return land to the land masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.