शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

कुडाळ सायकल क्लबच्या सायकल मॅरेथॉनला प्रतिसाद, ३२0 स्पर्धक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:31 IST

इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२० ही नियोजित सायकल स्पर्धा मोठ्या दिमाखात रविवारी पार पडली. ३२० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. ही स्पर्धा पॅडल्स अँड व्हिल्स आॅफ सिंधुदुर्ग व कुडाळ सायकल क्लबच्यावतीने आयोजित केली होती. सायकल सर्वांसाठी सर्वांच्या आरोग्यासाठी  ही टॅगलाईन घेऊन आयोजित केलेल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देकुडाळ सायकल क्लबच्या सायकल मॅरेथॉनला प्रतिसाद३२0 स्पर्धक सहभागी

कुडाळ : इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२० ही नियोजित सायकल स्पर्धा मोठ्या दिमाखात रविवारी पार पडली. ३२० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. ही स्पर्धा पॅडल्स अँड व्हिल्स आॅफ सिंधुदुर्ग व कुडाळ सायकल क्लबच्यावतीने आयोजित केली होती. सायकल सर्वांसाठी सर्वांच्या आरोग्यासाठी  ही टॅगलाईन घेऊन आयोजित केलेल्या या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी राजीव पवार यांच्यासह प्रसाद परब, अरविंद शिरसाट, राजन नाईक, महेंद्र बांदेकर, सदा अणावकर, रणजित देसाई, केदार सामंत, प्रणय तेली, नगराध्यक्ष ओंकार तेली, डॉ. सुबोधन कशाळीकर, पुष्कर कशाळीकर, डॉ. चुबे, डॉ. केसरे, संजय भोगटे उपस्थित होते.स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ सायकल क्लबचे डॉ. रावराणे यांनी केले तर स्पर्धेची सुरुवात कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी ध्वज फडकावून केले. स्पर्धेचे निवेदन प्रणय तेली यांनी केले. या स्पर्धेत सुमारे ३२० स्पर्धकांनी भाग घेऊन ही स्पर्धा रोमांचक व यशस्वी केली.

स्पर्धेची नियोजनाची जबाबदारी गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे व अमोल शिंदे यांनी स्वीकारली. तर प्रत्यक्ष मार्गावरची जबाबदारी क्लबचे सर्वेसर्वा रुपेश तेली, निलेश आळवे, अजिंक्य जामसंडेकर, राजीव पवार, प्रसाद परब केदार भाट, बाबा पोरे, अमित वळंजू यांनी अत्यंत समर्थपणे पेललीरजिस्ट्रेशनचे आॅनलाईन आणि आॅफलाईनचे काम रुपेश तेली यांनी तर टी-शर्टस् टॅग मेडलचे काम शिवप्रसाद राणे व स्निग्धा बांबुळकर यांनी पाहिले. स्पर्धेच्या नियोजनासाठी एसआरएम कॉलेजच्या एनसीसी विभागाने आपले एनसीसीचे १६ कॅडेट्स देऊन फारच मोलाची मदत केली.स्वयंसेवक म्हणून सचिन सावंत, पप्पू तवटे, विवेक मांडकुलकर यांनी २५ किलोमीटरचा महत्त्वाचा टप्पा अत्यंत काळजीपूर्वक हाताळला. स्पर्धा तीन टप्प्यात विभागली गेली होती. २५ किलोमीटर, ५० किलोमीटर व १०० किलोमीटर या तिन्ही गटात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

टॅग्स :CyclingसायकलिंगMarathonमॅरेथॉनsindhudurgसिंधुदुर्ग