बदनामी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर

By Admin | Updated: September 11, 2014 00:00 IST2014-09-10T22:22:06+5:302014-09-11T00:00:05+5:30

केसरकर समर्थक आक्रमक : पत्रकांची होळी करत सेना कार्यकर्त्यांचा इशारा

Respond to the defamatory responders | बदनामी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर

बदनामी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर

तळवडे : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दीपक केसरकर यांची बदनामी करणारी पत्रके वाटणाऱ्यांना तळवडे येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारताच पत्रके टाकून देत त्यांनी धूम ठोकली. यानंतर त्या पत्रकांची होळी करत सेना कार्यकर्त्यांनी केसरकरांची बदनामी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील तळवडे येथे माजी आमदार दीपक केसरकर यांची बदनामी करणारी पत्रके सावंतवाडीचे माजी नगरसेवक सुनिल पेडणेकर व त्यांचा एक साथीदार वाटत होते. हा प्रकार शिवसेना कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी तत्काळ त्यांना याबाबतचा जाब विचारला. यावेळी सेनेचे रवींद्र काजरेकर, काशिनाथ कुंभार, आनंद बुगडे, शरद गावडे, सुरेश गावडे, आपा परब, संतोष परब, गणपत लोके, सावळाराम गावडे, शांताराम परब, संतोष गावडे, प्रकाश रेडकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते.
उपस्थित सेना कार्यकर्त्यांनी सुनिल पेडणेकर यांच्याकडे बदनामीकारक पत्रके वाटता मग, पुरावे दाखवा असे सांगितले. शिवसेना कार्यकर्त्यांच्या या प्रश्नांमुळे सुनिल पेडणेकर व त्यांचा साथीदार पत्रके वाटणे सोडून तेथून माघारी फिरकले. त्यानंतर तेथे जमलेल्या शिवसैनिकांनी पेडणेकर यांचा निषेध करत त्या पत्रकांची होळी केली. तसेच केसरकरांची बदनामी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाणार, असा इशाराही यावेळी देण्यात
आला. (प्रतिनिधी)

तळवडे येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी केसरकरांची बदनामी करणाऱ्या पत्रकांची होळी करत निषेध व्यक्त केला.

Web Title: Respond to the defamatory responders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.