सिंधुदुर्ग येथे रक्तदान शिबीरास प्रतिसाद

By Admin | Updated: April 11, 2017 17:48 IST2017-04-11T17:48:50+5:302017-04-11T17:48:50+5:30

सामाजिक समता सप्ताहानिमित्त शिबीर

Respond to blood donation camps at Sindhudurg | सिंधुदुर्ग येथे रक्तदान शिबीरास प्रतिसाद

सिंधुदुर्ग येथे रक्तदान शिबीरास प्रतिसाद


आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

रक्तदान शिबीरासाठी सिव्हील हॉस्पीटल सिंधुदुर्गनगरी मधील रक्त संक्रमण अधिकारी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांचे पथक उपस्थित होते. या शिबीरामध्ये एकूण १७ व्यक्तीनी भाग घेऊन रक्तदान केलेले आहे. रक्तदान शिबीरावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग जयंत चाचरकर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक धर्मराज गोसावी, सहाय्यक लेखा अधिकारी स्नेहल मोरजे, कार्यालयीन अधिक्षक विष्णू चव्हाण, समाज कल्याण निरीक्षक सरदार खोत, सुनिल बागुल, रवि जाधव, भावू कांबळी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Respond to blood donation camps at Sindhudurg