वयोवृध्द खेळाडूंना मानधन

By Admin | Updated: May 30, 2017 18:35 IST2017-05-30T18:35:29+5:302017-05-30T18:35:29+5:30

क्रीडा विभागातर्फे अर्ज करण्याचे आवाहन

Respect old players | वयोवृध्द खेळाडूंना मानधन

वयोवृध्द खेळाडूंना मानधन

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. ३0 : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृध्द खेळाडूंना मानधन ही योजना क्रीडा व युवक सेवा संचालनालय स्तरावर कार्यान्वित आहे.

जिल्ह्यातील अशी कामगिरी केलेल्या वयोवृध्द खेळाडूंना या योजनेचा लाभ मिळण्याकरिता पात्र वयोवृध्द खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे विहीत नमुन्यात आपले अर्ज सादर करावेत. याबाबतचा विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्ष तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या dsosindhudurg.blogspot.inल्ल या ब्लॉगवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Web Title: Respect old players