खारेपाटण बाजारपेठेचा प्रश्न सोडवू : राणे
By Admin | Updated: January 10, 2015 00:11 IST2015-01-09T22:00:04+5:302015-01-10T00:11:08+5:30
खारेपाटण शहराला भेट देऊन येथील ग्रामस्थांशीही चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

खारेपाटण बाजारपेठेचा प्रश्न सोडवू : राणे
खारेपाटण : खारेपाटण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्न सोडवू, असे आश्वासन खारेपाटण विष्णूमंदिरात झालेल्या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी दिले. राणे यांनी खारेपाटण शहराला भेट देऊन येथील ग्रामस्थांशीही चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.आमदार राणे यांनी शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण, ग्रामपंचायत या प्रशासकीय कार्यालयांना भेटी दिल्यानंतर खारेपाटण पंचशीलनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ््याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व निवेदने स्विकारली. पंचशीलनगरच्यावतीने सायली तुरळकर, भरत पाटणकर यांनी राणे यांचे स्वागत केले. खारेपाटण विष्णूमंदिर येथे बैठकीला उपस्थित राहून खारेपाटण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा केली. दुपारनंतर चिंचवली, पुन्हा खारेपाटण काझीवाडी व बंदरवाडी येथील मुस्लीम बांधवांच्या भेटी घेतल्या. आमदार राणे यांच्या आजच्या खारेपाटण भेटीदरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, संजय धाक्रस, योगेश गोडवे, जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभा वळंजू, राष्ट्रीय काँगे्रसचे विभागीय अध्यक्ष रमाकांत राऊत, पंचायत समिती सदस्य दादा कर्ले, माजी पंचायत समिती सदस्य बाळा जठार, सूर्यकांत भालेकर, खारेपाटण सरपंच रिहाना काझी, उपसरपंच संदेश धुमाळे, युवक काँग्रेस कार्यकर्ते रफीक नाईक, मंगेश गुरव, माजी सरपंच किशोर माळवदे, विरेन चिके, ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई, महेंद्र गुरव, युती पोमेडकर, रविना चव्हाण, यास्मीन मुकादम, रविना ब्रह्मदंडे, यशवंत रायबागकर, तृप्ती माळवदे, प्रभाकर पोमेडकर, इस्माईल मुकादम, लियाकत काझी उपस्थित
होते. (वार्ताहर)