शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तालुकास्तरावरील याद्या तत्काळ रद्द करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 17:31 IST

Zp Sindhudurg- जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यानी मंजूर केलेल्या वैयक्तिक लाभाच्या याद्या सदस्यांना समान न्याय देणाऱ्या नाहीत. सत्ताधारी सदस्यांना झुकते माप देणाऱ्या आहेत. समिती सदस्य असणाऱ्या विरोधी सदस्यांवरसुद्धा अन्याय करण्यात आला आहे, असे विरोधी सदस्या स्वरूपा विखाळे यांनी सांगितले. यावर सभाध्यक्षा गावडे यांनी मंजूर होऊन तालुका स्तरावर गेलेल्या याद्या तत्काळ रद्द करण्याचा ठराव घेतला.

ठळक मुद्दे जिल्हा परिषद पशुसंवर्धन समिती सभा उपाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर सभेत सेनेचे एकतर्फी बहुमत

ओरोस : जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यानी मंजूर केलेल्या वैयक्तिक लाभाच्या याद्या सदस्यांना समान न्याय देणाऱ्या नाहीत. सत्ताधारी सदस्यांना झुकते माप देणाऱ्या आहेत. समिती सदस्य असणाऱ्या विरोधी सदस्यांवरसुद्धा अन्याय करण्यात आला आहे, असे विरोधी सदस्या स्वरूपा विखाळे यांनी सांगितले. यावर सभाध्यक्षा गावडे यांनी मंजूर होऊन तालुका स्तरावर गेलेल्या याद्या तत्काळ रद्द करण्याचा ठराव घेतला.

म्हापसेकर यांनी राजीनामा दिल्याने विरोधी सेनेचे एकतर्फी बहुमत समितीत झाले आहे. परिणामी मंगळवारी झालेल्या समिती सभेत सेनेचे तीन सदस्य उपस्थित राहिल्याने सभेचे अध्यक्षपद रोहिणी गावडे यांच्याकडे गेले.उपाध्यक्ष म्हापसेकर यांनी ३० मार्च रोजी पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीची मासिक सभा लावली होती. मात्र, २६ मार्च रोजी सभापती निवडीत डॉ. अनिशा दळवी यांना स्थान दिल्याने त्यांनी तत्काळ सभापती व जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे बुधवारी सभेला अध्यक्ष कोण ? ही चर्चा सुरू होती. सभा ११.३० वाजता होती. ती १२ वाजता सभा सुरू झाली. त्यावेळी केवळ रोहिणी गावडे, स्वरूपा विखाळे, अनुप्रिती खोचरे या तीन सदस्या उपस्थित होत्या.

या तिन्ही सदस्या विरोधी पक्ष सेनेच्या आहेत. यानंतर समिती सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध विकास अधिकारी डॉ. दिलीप शिंपी यांनी उपस्थित सदस्यांना विनंती करीत आपल्यातून एक सभाध्यक्ष निवडण्याची मागणी केली. यावेळी विखाळे यानी रोहिणी गावडे यांचे नाव सुचविले. त्यानुसार रोहिणी गावडे सभाध्यक्षा झाल्या. सभाध्यक्षा गावडे व विखाळे आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. त्यामुळे प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे. विरोधी सदस्य असताना सभाध्यक्ष या समितीत एकूण ९ सदस्य आहेत.सभापती म्हापसेकर, मनस्वी घारे, वेंगुर्ला सभापती अनुश्री कांबळी, देवगड सभापती, कणकवली सभापती, सावंतवाडी सभापती या सहा सदस्यांसह सभेला उपस्थित असलेल्या रोहिणी गावडे, स्वरूपा विखाळे, अनुप्रिती खोचरे यांचा यात समावेश आहे. सभेला म्हापसेकर यांच्यासह घारे व कांबळी अनुपस्थित राहिल्या.

कणकवली, देवगड व सावंतवाडीच्या जुन्या सभापतींनी राजीनामे दिल्याने तेथे नवीन सभापती विराजमान आहेत. परंतु, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली नाही. परिणामी सेनेचे असलेले तीन सदस्य उपस्थित राहिल्याने विरोधक असतानाही रोहिणी गावडे यांना सभाध्यक्ष पद भूषविण्याचा मान मिळाला. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग