इकोसेन्सिटिव्हला ग्रामस्थांचा विरोध
By Admin | Updated: January 3, 2015 00:03 IST2015-01-02T21:17:13+5:302015-01-03T00:03:23+5:30
तर विकासकामांना खीळ बसेल व मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल

इकोसेन्सिटिव्हला ग्रामस्थांचा विरोध
फणसगाव : इकोसेन्सिटिव्हबाबत झालेल्या जनसुनावणीत फणसगाव येथील ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला. फणसगाव ग्रामपंचायतीतर्फे घेतलेल्या जनसुनावणीवेळी आम्हाला विकास हवाय, इकोसेन्सिटिव्ह नको, अशी प्रखर भूमिका ग्रामस्थांनी मांडली. फणसगाव हा इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित झाला होता. पण येथील ग्रामस्थांना हा झोन मान्य नसल्याने ग्रामपंचायतीमार्फत त्यांची जनसुनावणी घेण्यात आली. इकोसेन्सिटिव्ह झोन झाला तर विकासकामांना खीळ बसेल व मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, हे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी याला कडाडून विरोध दर्शविला.
यावेळी सरपंच उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इकोसेन्सिटिव्ह विरोधी समिती स्थापन करण्यात आली. इकोसेन्सिटिव्ह लागू करण्यात येऊ नये, अशी भूमिका सर्वांनी मांडली. यावेळी उपसरपंच मंगेश गुरव, तलाठी पी. बी. रुपे, ग्रामसेवक आर. आर. फड, कृषी सहाय्यक किरण इंगळे, वनरक्षक एस. सी. फकीर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)