शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानाने राजीनामे द्या

By admin | Updated: December 1, 2014 00:18 IST

निषेध सभेत दीपक केसरकरांचा इशारा : सावंतवाडीतील एकजूट कायम ठेवा

सावंतवाडी : राजघराण्यातील अंतर्गत वाद ते कुटुंब सोडवेल. मात्र, याचा फायदा घेऊन काहीजण या संस्थेत शिरकाव करू पाहत असतील त्यांनी सन्मानाने राजीनामे द्यावेत, अन्यथा त्यांची पाळेमुळे खणून काढावी लागतील, असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला. तसेच सावंतवाडीची एकजूट यापुढेही कायम ठेवूया, असे आवाहनही आमदार केसरकरांनी केले.
दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वादानंतर नवीन नियामक मंडळ काढून संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा निषेध म्हणून सावंतवाडीतील नागरिक तसेच माजी विद्यार्थी यांची खास सभा पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी अनेक वक्त्यांनी राजघराण्याच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे ठरवत त्या दुहीवर चौफेर हल्ला चढवला.
या निषेध बैठकीत नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मंगेश तळवणेकर, वसंत केसरकर, काँॅग्रेस नेते संदीप कुडतरकर, बाळा गावडे, संजू परब, अ‍ॅड. सुभाष देसाई, अ‍ॅड. श्याम सावंत, प्रा.अन्वर खान, नगरसेवक विलास जाधव, संजय पेडणेकर, शर्वरी धारगळकर, किर्ती बोंद्रे, विठ्ठल गवस, यशवंत देसाई, शिवाजी सावंत, काका मांजरेकर, दादा कुडतरकर, अभय पंडित, डी. टी. देसाई, राजू मसूरकर, सतिश सावंत, सिताराम गावडे, श्यामकांत काणेकर उपस्थित होते.
यावेळी आमदार केसरकर म्हणाले, सावंतवाडी संस्थान आमची सर्वांची अस्मिता आहे. कै. शिवरामराजे भोसले यांनी जे काम केले आहे ते कोणीच विसरणार नाही. त्यांच्या प्रयत्नातून वृक्ष उभा असून त्या वृक्षावर ही बांडगुळे फोफावत होती. त्यांना आपण वेळीच छाटून टाकले पाहिजे. शिक्षणात कोणीच राजकारण आणू नये जर कोणी या संस्थेत राजकारण आणत असेल तर माझी आमदारकी पणाला लावीन आणि शिक्षण संस्था वाचवेन. आमचा लढा आजच संपलेला नाही. विघ्नसंतोषी लोकांनी आपले राजीनामे द्यावेत आणि यातून बाहेर पडावे अन्यथा त्यांच्या मुळापर्यंत जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
वसंत केसरकर यांनी राजघराण्याचा अपमान म्हणजे आमचा अपमान आहे म्हणून आज सावंतवाडीकर एक झाला आहे. तालुक्यातील प्रत्येक भागातून शेतकरी यात सहभागी होईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच जी मंडळी हे कटकारस्थान रचू पाहत आहेत त्यांना मोती तलावात बुडवले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
काँॅग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब म्हणाले, काँॅग्रेस एकत्रितपणे राजघराण्याच्या पाठिशी आहे. जे आमचे कोणी होते, त्यांनी आता राजीनामा दिला आहे. नारायण राणे यांनी दिलेला आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा असून राजघराण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असेही यावेळी परब म्हणाले.
काँग्रेस नेते संदीप कुडतरकर यांनी सांगितले की, या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पडद्यामागे कोण शकुनी मामा आहे त्याला पहिल्यांदा जनतेसमोर आणले गेले पाहिजे. इतर तालुक्यातील व्यक्तिंनी इथे येऊन आम्हाला राजकारण शिकवू नये आणि आमच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्नही करू नये. आम्ही गप्प बसणार नाही. सावंतवाडीची एकजूट ही पक्षभेद विसरून दाखवून देऊ. जे ही संस्था ताब्यात घेऊ इच्छितात, त्यांनी कळणे, बांदा येथे जे पराक्रम केले आहेत. त्याची सर्वांना माहिती आहे. त्यामुळे सावंतवाडीतील जनता यांना कधीही थारा देणार नाही, असा टोला त्यांनी यावेळी हाणला.
नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडीची जनता राजघराण्याच्या मागे ठामपणे उभी आहे आणि यापुढेही राहिल, असे स्पष्ट केले. तसेच आमच्या अस्मितेवर कोणी घाला घालू नये, त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असेही यावेळी साळगावकर म्हणाले.
उपनगराध्यक्ष राजन पोकळे म्हणाले, सावंतवाडी संस्थान हे सर्वांसाठी आदराचे स्थान आहे. आम्ही या संस्थेत शिकलो पण काहींनी मध्यंतरी आपली मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण आता त्यांचा डाव फसला असून खरा सूत्रधार कोण, तो जनतेसमोर यावा, अशी मागणी त्यांनी केली.
अ‍ॅड. सुभाष देसाई यांनी सांगितले की, कोणीही नेतृत्व करा पण ही संस्था वाचवा. हा लढा पुढे असाच सुरू ठेवा. आम्हाला लढण्याची इच्छा नाही. पण कोण जर वाट्याला येत असेल, तर सर्वांनी एकी दाखवावी, असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले.
माजी प्राध्यापक डी. टी. देसाई म्हणाले, मी सभासद केले नाहीत, माझ्यावर खोटे आरोप केले पण कळणे या एका गावातील जर तीनशे सभासद होत असतील तर इतर जिल्ह्यातून सभासद झाले तर काय चुकले. आम्हाला कॉलेज वाचवायचे आहे. दोन महाशयांनी या कॉलेजमधील शिक्षकांची अवस्था उसाच्या चिपाडासारखी करून ठेवली होती. त्याला कुठेतरी लगाम घातला गेला पाहिजे होता म्हणून आम्ही एकसंघ झालो आणि त्यातूनच आम्हाला इतर शिक्षकांनी साथ दिली. शिवराम राजेनी आम्हाला जी प्रेरणा दिली, ती आमच्या रक्तात भिनली असल्याचेही त्यांनी सांगितले. या निमित्ताने सदासेन सावंत, अ‍ॅड. सुभाष पणदूरकर, विठ्ठल गवस, बाळा गावडे, शिवाजी सावंत, काका मांजरेकर, सिताराम गावडे आदींनी यावेळी भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नकुल पार्सेकर यांनी केले.
एका वक्त्याने आपल्या भाषणात शिक्षकांनी कसा सुटकेचा निश्वास सोडला, ते सांगत असतानाच यापूर्वी हा उंदीर मारला पाहिजे होता. पण उंदीर मारला असता तर आमच्या गणपतीला राग आला असता, म्हणून सर्वजण याचे कारस्थान सहन करत राहिले, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)


शकुनीमामा शोधा
हे एवढे रामायण घडले यामागे कोणीतरी शकुनीमामा आहे. त्याचा येथील जनतेने शोध घ्यावा. जो आमच्यामध्ये फूट पाडण्यास आला असून त्याला वेळीच हद्दपार केले पाहिजे. बाहेरची गुंडगिरी येथे चालवू देऊ नका, अशी मते वक्त्यांनी मांडली.