शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ओसरगाव टोल नाक्यावरील टोलवसुलीविरोधात सिंधुदुर्गवासीय आक्रमक, व्यवस्थापकाला आणले फरफटत

By सुधीर राणे | Updated: June 14, 2023 16:22 IST

कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील टोल नाक्यावर कोरल असोसिएट, राजस्थान या ठेकेदार कंपनीकडून बुधवारी सकाळी ८ ...

कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील टोल नाक्यावर कोरल असोसिएट, राजस्थान या ठेकेदार कंपनीकडून बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून टोल वसुली सुरू करण्यात आली होती. सिंधुदुर्गवासीयांचा विरोध झुगारून ही टोल वसुली पोलिस बंदोबस्तात सुरु होती. मात्र, टोल वसुली करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगत कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांच्या  सूचनेनुसार सकाळी ८ वाजता सुरु केलेली टोल वसुली सकाळी ९.५५ वाजता थांबवण्यात आली. दरम्यान, टोल वसुली कंपनीचे व्यवस्थापक राहुल डांगे यांना संतप्त झालेल्या कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी फरफटत माध्यमांसमोर आणले.   टोल मुक्त सिंधुदुर्ग कृती समितीसह सर्वपक्षीय मंडळींनी त्या ठिकाणी येऊन सिंधुदुर्गवासीयांकडून टोल वसुली करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर टोल वसुली कंपनीच्या व्यवस्थापकाने स्थानिक प्रश्न प्रलंबित असल्याने लोकांचा विरोध लक्षात घेता टोल वसुली तूर्तास करू शकत नाही असे पत्र महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना दिले. तसेच ते पत्र टोल मुक्त कृती समितीलाही दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, या तात्पुरत्या टोल वसुली स्थगितीवर आम्ही समाधानी नसून, टोल वसुली सुरू केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा कृती समितीने दिला.बुधवारी सकाळी टोल मुक्त सिंधुदुर्ग कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये व अन्य पदाधिकारी , शिवसेना आमदार वैभव  नाईक, संदेश पारकर, भाजपाचे मनोज रावराणे, मिलींद मेस्त्री, राष्ट्रवादीचे अमित सामंत, कॉंग्रेसचे इर्शाद शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते टोल नाक्यावर दाखल झाले. सर्व राजकीय पक्षांच्यावतीने टोल वसुलीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला. अचानक पुन्हा टोल वसुली चालु केल्यास कोरल असोसिएटच्या कर्मचा-यांना टोल प्लाझा वर बसू देणार नसल्याचा इशारा सर्वपक्षीयांनी दिला. भाजप-कृती समितीचा स्वतंत्र फलकयावेळी स्थानिकांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे या मुद्यावर सर्वाचे एकमत दिसून आले. मात्र भारतीय जनता पार्टीकडून  घोषणाबाजी करत स्वतंत्र फलक टोल नाक्यावर लावण्यात आला. तर दुसरा फलक टोल मुक्त सिंधुदुर्ग कृती समितीने लावला होता. त्याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.व्यवस्थापकाला आणले फरफटत!टोल वसुली कंपनीचे व्यवस्थापक राहुल डांगे यांनी कृती समितीला राष्ट्रीय प्राधिकरणला दिलेल्या पत्राची प्रत देवून आपण टोल वसुली करत नसल्याचे आश्वासन दिले . मात्र डांगे हे  प्रसिद्धीमाध्यमांसमोर ते पत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याने संतप्त झालेल्या कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फरफटत माध्यमांसमोर आणले. त्यानंतर काहीवेळाने टोल वसुली बंद झाल्याने सर्व पक्षीयांचे आंदोलन स्थगित करण्यात आले. ओसरगाव येथे टोलवसुलीच्या मुद्दयावर निर्माण झालेला तणाव दुपारी १२ वाजता निवळला. त्यानंतर हळूहळू प्रशासनाने पोलिस बंदोबस्त कमी केला.

आंदोलनात सर्वपक्षीयांचा सहभाग!या आंदोलनात कृती समिती, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाकडून कणकवली नायब तहसिलदार शिवाजी राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कडक पोलिस बंदोबस्त!कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, किशोर सावंत,पोलिस निरीक्षक अनिल जाधव, उपनिरीक्षक वृषाली बरगे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाका