सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी रेश्मा सावंत
By Admin | Updated: March 21, 2017 16:40 IST2017-03-21T16:40:44+5:302017-03-21T16:40:44+5:30
उपाध्यक्षपदी काँग्रेसचे रणजित देसाई विजयी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी रेश्मा सावंत
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या रेश्मा सावंत, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचेच रणजित दत्तात्रय देसाई विजयी झाले. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात ही निवडणूक झाली. रेश्मा सावंत यांनी शिवसेनेच्या वर्षा उदय पवार यांचा ६ मतांनी पराभव केला. त्यांना २८ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे रणजित देसाई यांनी भाजपचे सुधीर गणपत नकाशे यांचाही सहा मतांनी पराभव केला. देसाई यांना २८ मते मिळाली.
राष्ट्रवादीच्या अनिशा दळवी यांनी त्यांचे निर्णायक मत काँग्रेसला दिल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने ऐनवेळी सभागृहात युती केली होती, परंतु त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. हात वर करुन हे मतदान झाले. निवडणुक होताच सर्व सदस्यांनी डेस्क वाजवून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून रविंद्र सावळकर यांनी काम पाहिले. जिल्हा परिषदेच्या सभागृहाबाहेर दुपारपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांंनी गर्दी केली होती. विजयी होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.