शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

sindhudurg: घारपी धबधब्याखाली अडकलेल्या गोव्यातील पर्यटकांची सुटका, बांदा पोलिसांची सतर्कता

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 24, 2023 12:20 IST

बांदा पोलिसांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

बांदा : सह्याद्री पट्ट्यात कोसळणार्‍या मुसळधार पावसाचा फटका गोव्यातील पर्यटकांना बसला. दोडामार्ग तालुक्यातील घारपी येथे पर्यटनासाठी गेलेल्या २४ हून अधिक पर्यटकांचा ग्रुप धबधब्याखाली अडकले होते. बांदा पोलिसांनी सतर्कता दाखवित अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने सर्व पर्यटक सुखरूप बचावले.घारपी ते असनिये रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने म्हापसा गोवा येथून पर्यटनासाठी आलेले २४ लोक त्यांच्या गाडीसह अडकलेले होते. पर्यटकांची अडकल्याचा डायल ११२ पोलिस प्रणालीवर कॉल आला होता. बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे यांनी ताशत्काळ सूत्र हलवली व फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक समीर भोसले व पोलिस ठाण्यातील ८ अंमलदार यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी गेले. अन् सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. बांदा पोलिसांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.पर्यटक अडकल्याची माहिती रवी जाधव यांना सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. त्यांनी तत्काळ आपल्या टीम आणि साहित्यासह पोलिसांच्या आपत्कालीन टीमसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र तत्पूर्वीच बांदा पोलिसांनी सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटनPoliceपोलिस