एटीएममधून ४0 हजार काढले
By Admin | Updated: December 23, 2014 00:55 IST2014-12-23T00:40:48+5:302014-12-23T00:55:38+5:30
पर्स अज्ञाताकडून रविवारी लंपास

एटीएममधून ४0 हजार काढले
सावंतवाडी : सावंतवाडी एसटी स्थानकावर पुणे-पणजी बसमध्ये चढत असताना अंजली पुुंडलिक केसरकर (वय ७०, रा. म्हापसा- गोवा) या महिलेची पर्स अज्ञाताकडून रविवारी लंपास करण्यात आली होती. याबाबतची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. सोमवारी तिच्या एटीएमचा वापर करत चोरट्याने चाळीस हजार रुपयेही काढल्याचे समोर आले आहे. याबाबतचा तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
रविवारी केसरकर यांच्या चोरलेल्या पर्समधील एटीएम कार्डवरच पासवर्ड लिहिलेला होता. त्याचा वापर करत चोरट्याने सोमवारी चाळीस हजार रुपये काढल्याचे सोमवारी पुढे आले असून सावंतवाडी पोलीस या चोरीप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)