अभ्यागत करातून चाळीस लाखांचे उत्पन्न धार्मिक स्थळ :
By Admin | Updated: October 29, 2014 00:10 IST2014-10-28T23:56:11+5:302014-10-29T00:10:24+5:30
वर्षभरातील करापोटी नवे संकल्प साकारण्याचा प्रयत्न

अभ्यागत करातून चाळीस लाखांचे उत्पन्न धार्मिक स्थळ :
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे हे धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात असून, 0येथे लाखो भक्त पर्यटक भेट देत असतात. गणपतीपुळेला येणाऱ्या भक्त पर्यटकांसाठी व गावच्या विकासासाठी अभ्यागत कर वर्षभरापूर्वी सुरु करण्यात आला. या कराच्या माध्यमातून वर्षभरात सुमारे ४० लाखांचे उत्पन्न गणपतीपुळे ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. अभ्यागत करातून मिळालेल्या उत्पन्नातून गावचा विकास व पर्यटक भक्तांसाठी सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यशदा संस्था, पुणेतर्फे संपूर्ण गणपतीपुळेचे सर्वेक्षण करुन पुढील १५ वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सरपंच रिमा बापट यांनी सांगितले. अभ्यागत कर योजनेमुळे गणपतीपुळे व परिसरातील अठरा युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या युवकांच्या माध्यमातून मंदिर रस्ता परिसरातील वाहतूक नियंत्रणासाठी प्रयत्न होत आहेत. ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभल्यानेच अभ्यागत कर प्राप्त होऊ शकल्याचे बापट म्हणाले. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांकडून अभ्यागत कर वसूल करण्यात येत आहे. या करातून परिसर विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. अभ्यागत करातून उपलब्ध झालेला रोजगार महत्त्वाचा ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)