ज्या धर्मात जन्मला तोच श्रेष्ठ माना
By Admin | Updated: January 8, 2015 00:05 IST2015-01-07T20:51:34+5:302015-01-08T00:05:09+5:30
उद्धव जावडेकर : वेंगुर्ले येथे कीर्तन महोत्सव

ज्या धर्मात जन्मला तोच श्रेष्ठ माना
वेंगुर्ले : आपण ज्या धर्मात जन्माला आलो आहोत, तो धर्म श्रेष्ठ आहे. प्रत्येकाने धर्माचे आचरण करावे, असे आवाहन वेंगुर्ले येथील रामेश्वर मंदिरात सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवावेळी ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांनी उपस्थितांना केले.
वेंगुर्ले तालुका ब्राम्हण मंडळ, युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पुणे येथील ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव वसंत फडके या विषयावर कीर्तन सादर केले. ज्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले, त्यांचा इतिहास सध्याच्या पिढीला समजणे आवश्यक आहे. आपल्या हिंदू धर्माबाबत आदर आणि अभिमान बाळगा, असे सांगत जावडेकर यांनी वासुदेव बळवंत यांचे जीवनचरित्र श्रोत्यांपुढे मांडले. ब्रिटिशांना न घाबरता स्वत:च्या कठीण प्रसंगीही फडके यांनी केलेले कार्य कीर्तनातून उत्कृष्टपणे सादर केले.
या कीर्तन महोत्सवाची सांगता बुधवार ७ जानेवारी रोजी होणार
असून, यावेळी ह.भ.प. मनोहरबुवा दीक्षित (औरंगाबाद) यांचे गोपाळ काल्याचे कीर्तन होणार आहे.
सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.
(प्रतिनिधी)