मान्सूनपूर्व पावसाने मालवणकरांना दिलासा
By Admin | Updated: May 25, 2016 23:35 IST2016-05-25T22:41:16+5:302016-05-25T23:35:36+5:30
समुद्री लाटांनीही जोर धरल्याने राजकोट येथील खडकाळ भागात धडकून, त्या ठिकाणीच अडकून पडला.

मान्सूनपूर्व पावसाने मालवणकरांना दिलासा
fमालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गेले काही दिवस रिमझिम बरसणाऱ्या पावसाने बुधवारी मालवण तालुक्यात जोरदार हजेरी लावली. सकाळी हजेरी लावणारा पावसाची आचरा परिसर तसेच अन्य गावांत दिवसभर रिमझिम सुरू होती. पावसाच्या सरीमुळे हवेत काही प्रमाणात गारवा पसरल्याने उकाड्याने हैराण झालेल्या मालवणकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, समुद्रातही मान्सून पूर्व हालचालींनी वेग पकडला आहे. बुधवारी संध्याकाळी मासेमारी करून मालवण बंदरात परतणाऱ्या बाळा बाभल यांच्या ट्रॉलर्सचे इंजिन अचानक बंद पडले. त्यात समुद्री लाटांनीही जोर धरल्याने राजकोट येथील खडकाळ भागात धडकून, त्या ठिकाणीच अडकून पडला. यात ट्रॉलर्सचे काही प्रमाणात नुकसानही झाले. यावेळी स्थानिक मच्छिमारांनी ट्रॉलर्सकडे धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत ट्रॉलर्स बंदरात सुरक्षित ठिकाणी आणण्याची कार्यवाही सुरू होती. बुधवारी सकाळी मालवणमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर तालुक्यातील किनारपट्टी भागातील गावांतही पावसाची रिमझिम दिवसभर सुरू होती. आचरा परिसरात पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते, तर ठिकठिकाणी घर दुरुस्ती व अन्य काही कामे सुरू असलेल्या नागरिकांची एकच धांदल उडाली. (प्रतिनिधी)