कलचाचणी बाबत अहवाल संकेतस्थळावर जारी
By Admin | Updated: April 22, 2017 13:38 IST2017-04-22T13:38:12+5:302017-04-22T13:38:12+5:30
१५ मे पर्यंत समुपदेशन कक्ष कार्यान्वित

कलचाचणी बाबत अहवाल संकेतस्थळावर जारी
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. २१ :महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी २०१७ मध्ये इयत्ता १० वी च्या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्र्थ्याची कलमापन चाचणी घेतलेली आहे. त्यांच्या कल अहवाल संकेत स्थळावर आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कलमापन चाचणी अहवाल स्वयंस्पष्ट असून त्याव्दारे विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन होईलच परंतु ज्या विद्यार्थ्यांंना कल अहवालाव्दारे अधिकचे मार्गदर्शन मिळण्यासाठी जिल्हास्तरावर समुपदेशन कक्ष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्लॉट नं. ८७/८९ नवनगर वसाहत गरूड सर्कल जवळ, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे स्थापन करणेत आलेला आहे.
दिनांक २५ एप्रिल २०१७ ते १५ मे २०१७ या कालावधीत कार्यालयीन वेळेत हा कक्ष सुरू राहिल, सदर कालावधीत प्रशिक्षित समुपदेशकामार्फत विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांंना पुढील करिअर-अभ्यासक्रम निवडण्यासाठी अधिकचे मार्गदर्शन मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या वर्षी इयत्ता १० वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.