शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील वाळूचा दर कमी करा !, अब्दुल सत्तार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:47 IST

sindhudurg, Vaibhav Naik, Abdul Sattar, sand कोरोनाची महामारी तसेच शासनाला मिळणार महसूल याचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हातपाटीच्या वाळूचा प्रति ब्रासचा १८६० रुपये असलेला दर कमी करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.त्याचबरोबर ८ दिवसांत त्याबाबतचा अहवाल मंत्रालयात सादर करण्यास त्यांनी सांगितले आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील वाळूचा दर कमी करा !, अब्दुल सत्तार यांच्या अधिकाऱ्यांना सूचनावैभव नाईक यांची माहिती , मुंबई येथे बैठक

कणकवली : कोरोनाची महामारी तसेच शासनाला मिळणार महसूल याचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हातपाटीच्या वाळूचा प्रति ब्रासचा १८६० रुपये असलेला दर कमी करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.त्याचबरोबर ८ दिवसांत त्याबाबतचा अहवाल मंत्रालयात सादर करण्यास त्यांनी सांगितले आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हातपाटीच्या वाळूचा प्रति ब्रासचा दर निश्चित करण्यासाठी मंगळवारी मुंबई येथील मंत्रालयात महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी आपल्यासह माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, कोकण सहाय्यक आयुक्त मनोज रानडे, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मनोज बडीये,सिंधुदुर्गचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी व जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील उपस्थित होते.या बैठकीत वाळू प्रश्नी मंत्री अब्दुल सत्तार यांचे लक्ष वेधताना आमदार दिपक केसरकर व आपण गतवर्षीच्या वाळूच्या प्रति ब्रास दराकडे त्यांचे लक्ष वेधले. २०१९ झ्र २० मध्ये वाळूचा प्रति ब्रास दर १८६० रुपये होता. ही किंमत जास्त असल्याने वाळु परवान्यांसाठी कुणी जास्त सहभाग घेतलेला नव्हता.

यामुळे शासनाचा महसूल बुडून नुकसान झाले होते.दोन वर्षांपूर्वी १२०० रुपये दर असताना शासनाला १६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.मात्र गतवर्षी हा दर १८६० झाल्याने केवळ २ कोटीचा महसूल शासनाला प्राप्त झाला. गेल्या तीन वर्षात ५० टक्के पेक्षा जास्त वाढ वाळू लिलावा संदर्भात झालेली आहे.मात्र यावर्षी हा दर कमी न झाल्यास गतवर्षीप्रमाणेच परिस्थिती होणार आहे.

यामुळे अनधिकृत वाळू उत्खननास चालना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाळू लिलावामुळे स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होते.त्यामुळे यावर्षी वाळूचा प्रतिब्रास दर कमी करून, वाळू परवानाधारक व सर्वसामान्य जनतेलाही दिलासा द्यावा. अशी मागणी दीपक केसरकर व आपण मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली.

या मागणीच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत कोरोना महामारी व वाळूचा दर जास्त झाल्याने शासनाचा बुडालेला महसूल याचा विचार करून प्रति ब्रास वाळूचा दर कमी करून ८ दिवसांत त्याबाबतचा अहवाल मंत्रालयात सादर करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत.तसेच वाळू लिलावाचा सर्व्हेही करण्यास त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :sandवाळूsindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Abdul Sattarअब्दुल सत्तार