शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी भरतीवरून विभाग नियंत्रकांना धरले धारेवर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 20:51 IST

कणकवली : एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाच्या नोकर भरतीत स्थानिकांना डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला.

कणकवली : एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाच्या नोकर भरतीत स्थानिकांना डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. या नोकर भरतीत मोठा घोटाळा झाला असून, किंबहुना हा घोटाळा करण्यासाठी एसटी महामंडळाने एजन्सीमार्फत भरती केल्याचा आरोप करून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शिष्टमंडळाने एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांना धारेवर धरले.भरती झालेल्यांना सुरू असलेले प्रशिक्षण दोन दिवसांत थांबविण्यात यावे, नाहीतर जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना हुसकावून लावण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिष्टमंडळाने यावेळी दिला. माजी उपसभापती संतोष कानडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांची भेट घेतली. तसेच नोकर भरतीत स्थानिकावरील अन्यायाचा जाब विचारला. यावेळी सहाय्यक यंत्र अभियंता ए. एस. मांगलेकर उपस्थित होते.नोकर भरतीत ६० टक्के स्थानिक उमेदवारांची निवड केल्याचे हसबनीस यांनी सांगताच १०० टक्के स्थानिकांना संधी का नाही देण्यात आली ? यावर हसबनीस यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे नोकर भरती झाली. यामध्ये आपला काही रोल नाही. असे सांगताच ज्यांचा रोल आहे त्यांना आमच्यापुढे उभे करा. त्यांनी निकषावर स्थानिकांना डावलले? या भरतीवर शासनाचे काय नियंत्रण आहे? घोटाळा करण्यासाठीच एजन्सीमार्फत भरती केली का? असा प्रश्नांचा भडिमार शिष्टमंडळाने केला.प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना प्राधान्य न दिल्याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली असता त्यांनी सिंधुदुर्ग विभागाने प्रतीक्षा यादी कळविली नसल्याचे सांगतिले. याकडे कानडे यांनी लक्ष वेधले असता हसबनीस यांनी प्रतीक्षा यादीची कालमर्यादा संपल्याने त्यांची भरती करता येणार नसल्याचे सांगितले. खुल्या प्रवर्गातील जागांवर आरक्षीत उमेदवारांची भरती केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.मुंबईच्या यू. एस. टेक्नॉलॉजी एजन्सीमार्फत सिंधुदुर्ग विभागात ३२५ उमेदवारांची भरती झाली असून, त्यांचे कुडाळ, कणकवली, देवगड व मालवण आगारात प्रशिक्षण सुरू झाल्याची माहिती एका प्रश्नाला उत्तर देताना हसबनीस यांनी दिली. स्थानिकांवरील अन्यायाबाबत आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधणार असून दोन दिवसांत हे प्रशिक्षण थांबविण्यात यावे नाही तर कायदा हातात घेऊ, असा इशारा यावेळी दिला. या शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य मनोज राणे, मिलिंद मेस्त्री, महेंद्र डिचवलकर, सरपंच संदीप सावंत, कोळोशी सरपंच सुशील इंदप, संजय रावले अन्यायग्रस्त उमेदवार प्रफुल्ल तोरसकर आदींचा समावेश होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग