सद्गुरु चरणातून खरी सुखप्राप्ती : फरिदाबादी

By Admin | Updated: September 7, 2014 23:55 IST2014-09-07T23:36:57+5:302014-09-07T23:55:50+5:30

आध्यात्मिक फेरी : निरंकारी मिशनचा उपक्रम

Real pleasure from Sadguru: Faridabadi | सद्गुरु चरणातून खरी सुखप्राप्ती : फरिदाबादी

सद्गुरु चरणातून खरी सुखप्राप्ती : फरिदाबादी

चिपळूण : आज जगातील प्रत्येक मनुष्य सुखी बनू इच्छितो. परंतु, सद्गुरुला शरण गेल्याशिवाय कोणीही खऱ्या अर्थाने सुखी बनू शकत नाही. सुख आणि दु:खाची खरी परिभाषा सद्गुरु शिकवितो. जग ज्या गोष्टीला सुख आणि दु:ख मानते ते सुख अंतिम श्वासाला संपवून जाते. सद्गुरु आत्मा, परमात्माची भेट घालून जन्म मरणाच्या चक्रातून आत्म्याची सुटका करतो आणि खरे सुख प्रदान करतो, असे प्रतिपादन निरंकारी मिशनचे केंद्रीय प्रचारक चन्नी फरीदाबादी यांनी येथे केले.
जगाच भलं व्हावं म्हणून संत महापुरुषांनी युगायुगाला मानवासाठी दिव्य संदेश दिले. याच हेतूने प्रेरित होऊन संत निरंकारी मिशन, चिपळूण, खेड, गुहागर या शाखेतर्फे चिपळूण शहरातून अध्यात्मिक जागृती फेरी काढण्यात आली. यानंतर राधाताई लाड सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चन्नी बोलत होते. सद्गुरु देशाचे दर्शन करुन देवाला पाहणारी दृष्टी आपल्या मूळ दृष्टीत टाकतो. वास्तविक निराकार ईश्वराच्या भेटीने मुक्ती प्राप्त होते. परंतु, ईश्वराचे दर्शन करविणाऱ्या सद्गुरुला धर्म ग्रंथाने देवापेक्षा महान म्हटले आहे. जसे तहान लागलेली व्यक्ती पाण्याचे उपकार मानत नाही तर तहान भागवणाऱ्याचे उपकार मानते. ईश्वराने लाखो, करोडोचे शरीर आपल्याला दिले आहे. ज्याचे शरीर चांगले आहे, त्याच्याजवळ सर्व दौलत आहे. परंतु, अशा मानवाचे मन प्रभूच्या स्मरणात लागत नाही आणि हेच मोठे नवल आहे, अशी भावनाही चन्नी यांनी व्यक्त केली.
यावेळी क्षेत्रीय प्रबंधक गंगाधर विचारे यांनीही मनोगत व्यक्त केले. चेन्नी कमलेश यांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विजय विचारे यांनी केले. (वार्ताहर)

अध्यात्मिक जागृतीद्वारे मिशनचा संदेश, सिद्धांत, समाजकारी आणि भक्ती विचारधारा बॅनर्स, गीते व माहिती चिपळूणवासीयांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या फेरीतील शिस्त, परिधान केलेले अ‍ॅप्रन बॅनर्स, सेवादल वर्दीतील निरंकारी भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यामध्ये छोट्या बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत निरंकारी भक्त सहभागी झाले होते.

Web Title: Real pleasure from Sadguru: Faridabadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.