शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
2
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
3
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
4
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
5
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
6
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
7
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
8
नताशाशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा माहिकासोबत साखरपुडा? अभिनेत्रीच्या हातात दिसली अंगठी
9
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा 
10
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
11
"तू ओवर ॲक्टिंग करतोय"; शिक्षिकेने वर्गात केला अपमान; सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रोसमोर घेतली उडी
12
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
13
कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
14
India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
15
पाकिस्तानच्या शेअर बाजारात पैशांचा पाऊस, भारत राहिला मागे; एक्सपर्ट म्हणाले, "पुढच्या १० वर्षांत..."
16
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर
17
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
18
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
19
Palmistry: तळहातावर ‘या’ रेषा करतात अचानक श्रीमंत, शनिचे वरदान; भरपूर पैसा, राजयोगाचे जीवन!
20
देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
Daily Top 2Weekly Top 5

विकास ग्रामस्थांपर्यंत पोहोचवा :  नारायण राणे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 15:27 IST

GramPanchyat Narayan Rane Sindhudurg- केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम करा. केवळ ग्रामपंचायत इमारत सुंदर असून चालत नाही, तेथील कारभारी सुंदर असायला पाहिजे. यासाठी ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीच्या कामाकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केले.

ठळक मुद्देविकास ग्रामस्थांपर्यंत पोहोचवा :  नारायण राणे यांचे आवाहन वजराट ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन

वेंगुर्ला : ग्रामपंचायत म्हणजे गावाचे मंत्रालय असतं. याठिकाणी काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आपण सेवक या नात्याने काम करून गावाचा विकास करावा. केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम करा. केवळ ग्रामपंचायत इमारत सुंदर असून चालत नाही, तेथील कारभारी सुंदर असायला पाहिजे. यासाठी ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीच्या कामाकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केले.वजराट येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, वजराटचे सरपंच महेश राणे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मनीष दळवी, वेंगुर्लाचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, अंकुश जाधव, जि. प.चे सदस्य प्रीतेश राऊळ, वसंत तांडेल, राजू राऊळ, सरपंच समिधा कुडाळकर, पप्पू परब, शंकर घारे, माजी सभापती सुचिता वजराटकर, सारिका काळसेकर, गटविकास अधिकारी उमा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.राणे म्हणाले, सरपंच महेश राणे यांच्याबरोबर चर्चा करताना राणे यांनी गावात १०० टक्के लोक साक्षर असल्याचे व वीस कुटुंबे दारिद्रयरेषेखालील असल्याचे सांगितले. मात्र, येत्या वर्षभरात गावात एकही कुटुंब दारिद्रयरेषेखाली राहणार नाही यासाठी प्रयत्न करा, असे नारायण राणे यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच नितीन चव्हाण, वामन भोसले, गावातील आजी, माजी सरपंच, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानिमित्त गावातील माजी सरपंच, ग्रामसेवक, प्रतिष्ठित नागरिक यांचा सन्मान नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजन तेली यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार राजा सामंत यांनी मानले.जिल्हा विकासाच्याबाबतीत दहा वर्षे मागे गेलाराणे पुढे म्हणाले, आजच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर पालकमंत्री, आमदार यांची नावे आहेत, परंतु कुणी आले नाहीत. जे गावच्या विकासाभिमुख कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत अशांना मी लोकप्रतिनिधी म्हणत नाही. या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण गेली बत्तीस वर्षे कार्यरत आहे. मात्र, सध्याच्या सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पाठ केल्याने जिल्हा विकासाच्या बाबतीत दहा वर्षे मागे गेला, अशी टीका राणे यांनी केली. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे gram panchayatग्राम पंचायतsindhudurgसिंधुदुर्ग