विषय समिती पदांसाठी आज फेरनिवडणूक

By Admin | Updated: November 4, 2014 22:46 IST2014-11-04T22:46:48+5:302014-11-04T22:46:48+5:30

जिल्हा परिषद : सभापतिपदाची माळ कोणाला?

Re-election today for topic committee posts | विषय समिती पदांसाठी आज फेरनिवडणूक

विषय समिती पदांसाठी आज फेरनिवडणूक

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपदाची फेरनिवडणूक ५ नोव्हेंबरला होणार असून कोणाच्या गळ््यात सभापतिपदाची माळ पडते याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. दिलीप रावराणे, सोनाली घाडीगावकर, संजय बोंबडी यांची नावे चर्चेत आहेत. सभापतिपदावर कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांची मुदत १ आॅक्टोबरला संपल्याने या पदासाठीची २ आॅक्टोबरला निवड होती. मात्र, यावेळी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाकडून या पदांसाठी अर्ज न भरल्याने ही निवडणूक रद्द झाली होती. सभागृहात सत्ताधारी तसेच विरोधी सदस्य उपस्थित न राहिल्याने ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. अशी स्थिती उद्भवली तर पुढे उपाययोजना काय? याचे मार्गदर्शन जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे मागितले होते. त्यानुसार या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक ५ नोव्हेंबरला होणार आहे.
यापूर्वी शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रकाश कवठणकर, वित्त व बांधकाम सभापती भगवान फाटक, महिला व बालकल्याण सभापती श्रावणी नाईक, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांना पदावरून १ आॅक्टोबर रोजी अडीच वर्षांची मुदत संपल्याने पायउतार व्हावे लागले.

Web Title: Re-election today for topic committee posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.