शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रांवर साहित्यासह कर्मचारी रवाना!

By सुधीर राणे | Updated: May 6, 2024 12:53 IST

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी प्रशासन सज्ज

कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ३३२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून  सोमवारी २० टेबलवरून साहित्य वाटप करण्यात आले. ते साहित्य घेऊन २३२४ अधिकारी, कर्मचारी व पोलिस एसटी, जीप गाड्यांच्या मदतीने कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर रवाना झाले.दरम्यान , कायदा व  सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.  मतदान प्रक्रीया शांततेत पार पडावी यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत आहे. कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणावर मतदान साहित्य वाटप प्रक्रिया आज, सोमवारी झाली.यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे, वैभववाडी तहसिलदार सूर्यकांत पाटील, देवगड तहसिलदार संकेत यमगर आदींसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांनी भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, प्रतिनिधी, पोलिस, होमगार्ड, मतदान सहाय्यक प्रतिनिधी अशा २३२४ कर्मचाऱ्यांनी आपापल्या केंद्रातील सर्व साहित्य ताब्यात घेतले.काही कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.मतदान केंद्रांवर ४७ झोनल अधिकारी ठेवणार नियंत्रण कणकवली विधानसभा मतदार संघातील ३३२ केंद्रासाठी सोमवारी सकाळपासून साहित्य वाटप करण्यात आले. हे साहित्य कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी २० टेबल कणकवली महाविद्यालयाच्या  पटांगणावरील मंडपात मांडण्यात आली होती.  ईव्हीएम व व्हिव्हीपॅट मशिन आणि स्टेशनरी असे साहित्य तसेच  अधिकारी , कर्मचारी ४५ एसटीच्या गाड्या व ५ जीप गाड्यांच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचले.३३२ केंद्रांपैकी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन व तीन, पोलिस कर्मचारी तसेच दिव्यांगांसाठी स्वयंसेवक, पाळणाघरासाठी अंगणवाडी अथवा आशा स्वयंसेविका व व्यवस्थापक तैनात असणार आहेत. याशिवाय ४७ झोनल अधिकारी व ३८ मायक्रो ऑब्झर्व्हर अधिकारीही असून त्यांना स्वतंत्र गाड्या देण्यात आलेल्या आहेत. या झोनल अधिकारी व मायक्रो ऑब्झर्व्हर अधिकाऱ्यांची वाहने तसेच मतदान साहित्य घेऊन जणाऱ्या बस जीपीएस यंत्रणेने जोडण्यात आली आहेत.विशेष मतदान केंद्र !वागदे येथील ३०७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचारी तर ओसरगाव येथील ३३२ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर दिव्यांग कर्मचारी असतील. देवगड तालुक्यातील जामसंडे येथील मतदान केंद्रावर युवा कर्मचारी कार्यरत असणार आहेत.ही तीन विशेष मतदान केंद्रे कणकवली विधानसभा मतदार संघात तयार करण्यात आली आहेत.

मतपेट्या एच.पी.सी.एल.सभागृहात जमा करणार !मतदान झाल्यानंतर ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशिन्स व साहित्य कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात एकत्रित करण्यात येणार आहे. तसेच साहित्य एकत्रित केल्यानंतर या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशिन्स रत्नागिरी येथे पाठविण्यात येतील. तसेच तेथील स्ट्राँगरुममध्ये सीलबंद करण्यात येतील. त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल. तर त्याच ठिकाणी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४