शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: सोशल मीडियाव्दारे घेतला जातोय निकालाबाबत कल

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 9, 2024 19:10 IST

सिंधुदुर्ग : सोशल मीडियावर सकाळचे गुड मॉर्निंग, शुभ प्रभात मेसेजच्या ठिकाणी आता कोण येणार निवडून, आपला अंदाज काय ? ...

सिंधुदुर्ग : सोशल मीडियावर सकाळचे गुड मॉर्निंग, शुभ प्रभात मेसेजच्या ठिकाणी आता कोण येणार निवडून, आपला अंदाज काय ? अशा मेसेजव्दारे निवडणूक निकालाचा कल अनेकांकडून घेण्यात येताना दिसून येत आहे. यामध्ये मतदार, मित्रमंडळी आपापले मत व्यक्त करताना दिसून येत आहेत. कोणी कमळ तर कोणी मशाल असे मत व्यक्त करीत असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नेमका कोणाचा विजय होईल, याबाबत अंदाज बांधले जात आहेत.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात मंगळवार ७ मे रोजी शांततेत पार पडली. यात ९ उमेदवारांचे भाग्य ‘इव्हीएम’मध्ये बंद झाले आहेत. ४ जून रोजी निकाल लागणार आहे. तत्पूर्वी फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडियावर काही जण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोणाचा विजय होणार ? मत नोंदवा असा मेसेज टाकत आहेत.या मेसेजला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक मतदार आपला कल त्यावर सांगत आहेत. तर काही राजकीय व्यक्ती आपला उमेदवारच निवडून येण्याचाही दावा येथे करताना दिसून येत आहेत. या निवडणुकीच्या निकालावर विधानसभेचे बरेच समीकरण अवलंबून आहे. त्यामुळे आमदारांना सुद्धा लोकसभेच्या निकालाची चिंता लागली आहे.

राजकीय पक्षांचे पदाधिकारी करताहेत दावे

  • सोशल मीडियावर काही जणांनी टाकण्यात आलेल्या मेसेजल काही राजकारणी कार्यकर्ते मत नोंदविण्याऐवजी आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा करीत आहेत.
  • यामध्ये तर काही असेही आहेत की ज्यांच्या उमेदवारांचा कुठेच थांगपत्ता नाही तेसुद्धा आमचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे ठासून सांगत आहेत. यामुळे यातून काहींचे मनोरंजनसुद्धा होत आहे.

कोणीही निवडून आले तरी पळसाला पाने तीनच

  • सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या मेसेजवर काही जण ‘कोणीही आले तरी पळसाला पाने तीनच’ अशीसुद्धा प्रतिक्रिया देऊन आपले मत नोंदविता दिसून येत आहेत.
  • निवडणूक निकालाच्या अनुषंगाने सट्टा बाजारातही मोठी उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सट्टा लावण्यात येत असल्याचे चित्र आहे.
  • लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असल्याने सर्वांचे लक्ष ४ जूनकडे लागलेले दिसून येत आहे.
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narayan Raneनारायण राणे Vinayak Rautविनायक राऊत