शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पहिल्या टप्यात ८.१७ टक्के मतदान, चिपळूणमध्ये सर्वाधिक मतदान

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 7, 2024 11:33 IST

राणे, केसरकर, नाईक यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क 

सिंधुदुर्ग : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत संपूर्ण मतदारसंघात ८.१७% मतदान झाले आहे. या मतदारसंघात महायुतीतर्फे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध विद्यमान उद्धव सेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्नी नीलम राणे आणि सून प्रियांका राणे यांच्या सोबत मतदानाचा हक्क बजावला.  आमदार नितेश राणे यांच्या पत्नी नंदिता राणे यांनी वरवडेत, आमदार वैभव नाईक यांनी सहकुटुंब कणकवलीत तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब सावंतवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला.सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात चिपळूण मध्ये सर्वाधिक १०.१३% रत्नागिरी मध्ये सहा टक्के राजापूर मध्ये १०.९.% कणकवली मध्ये ७ टक्के कुडाळमध्ये ७.९८% तर सावंतवाडीमध्ये ८.३९% मतदान झाले आहे.दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. कडक उन्हाळा भासत असल्याने सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने ही सर्वच मतदान केंद्रावर मतदारांसाठी वेगवेगळ्या सुख सुविधा केल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी कणकवली शहरातील काही मतदान केंद्रांची पाहणी देखील केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४VotingमतदानNarayan Raneनारायण राणेDeepak Kesarkarदीपक केसरकर Vaibhav Naikवैभव नाईक