शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मालवण आगारातून रत्नागिरी, कोल्हापूर बसफेऱ्या सुरू, जाणून घ्या एसटी बसचे वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 12:08 IST

कुडाळ, कणकवली, देवगड, वेंगुर्ले या मार्गावरही बसफेऱ्या वाढविल्या असल्याची माहिती आगार प्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली.

मालवण : येथील एसटी आगारातून आजपासून मालवण रत्नागिरी व मालवण कोल्हापूर ही बसफेरी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान कुडाळ, कणकवली, देवगड, वेंगुर्ले या मार्गावरही बसफेऱ्या वाढविल्या असल्याची माहिती आगार प्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली.मालवण रत्नागिरी ही बसफेरी सकाळी साडे आठ वाजता तर कोल्हापूर बसफेरी दुपारी दोन वाजता सुटणार आहे. कुडाळ मार्गावर सकाळी ८, ९, ११, १२, २, ४, ५, ७. ४५ यावेळेत आठ फेऱ्या, कणकवली मार्गावर सकाळी ७, दुपारी ३.३० वाजता, कसाल मार्गावर दुपारी १ वाजता, देवगड मार्गावर सकाळी ७.४५ वाजता, दुपारी १ वाजता, वेंगुर्ले मार्गावर सकाळी ८ वाजता, दुपारी २ वाजता अशा बसफेऱ्या सोडण्यात आल्या आहेत.सहा चालक, सहा वाहक सेवेत हजर झाले आहेत तसेच अन्य एक यासह मॅकेनिक, ऑफिस स्टाफ हजर झाले असल्याचे श्री. बोवलेकर यांनी स्पष्ट केले. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करत काही मागण्या मान्य केल्या आहेत. तरीही एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. मात्र, काही कर्मचारी कामावर हजर झाल्याने काही प्रमाणात एसटीची सेवा सुरु झाली आहे. शासनाकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याबाबत आवाहन केले जात आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गST Strikeएसटी संपRatnagiriरत्नागिरीkolhapurकोल्हापूर